कलाकेंद्र चालकाकडून गुंडामार्फत पत्रकारास धमकी

नेकनुर पोलिसांची भुमिका संशयास्पद, त्या पिडीतेसंदर्भात कारवाईचा सोपस्कार

0

बीड, रयतसाक्षी:  कला केंद्रावर काम करणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेला अमानुष मारहाण करत तीच्या ईच्छे विरूद्ध् वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. त्यानंतर पिडितेस दमदाटी करून तिच्या मुलीला डांबून ठेवल्याचा प्रकार,  नेकनुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला होता. मात्र या प्रकरणात नेकनूर पोलिसांनी आरोपींना पाठीशी घालत केवळ कारवाईचा सोपस्कार केल्याचा धक्कादाय प्रकार समोर आला आहे.

 

विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपीस नेकनुर पोलिसांनी अद्याप अटक केली नाही. त्यामुळे नेकनुर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या एका स्थनिक पत्रकारास, गुंडांनी गाडी आडवी लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पत्रकार अशोक काळकुटे यांनी केला आहे.

 

सोलापूर महामार्गावरील उदंड वडगाव येथील कला केंद्रातील एका ३५ वर्षीय महिलेला बळजबरीने वेश्या व्यवसाय करायला लावुन, तिच्या १२ वर्षीय मुलीला डांबुन ठेवल्याची तक्रार पिडीतेने पोलीस अधीक्षकांना दिल्याची दखल घेत  महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी थेट संबंधित नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, मुस्तफा शेख यांना फोन करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.

 

मात्र नेकनूर पोलिसांनी पीडिता ही खोटं बोलत असल्याची बतावनी करत केवळ कारवाईचा सोपस्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. मात्र अद्याप पर्यंत संबंधित आरोपीला अटक करण्यात आली नसून पिडीतेच्या १२ वर्षीय मुलीची बालसुधारगृहात रवानगी केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख यांनी दिली आहे.

 

महिला आयोगाच्या निर्देशाला हरताळ ?

पिडितीच्या तक्रारीवरून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नेकनुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुस्तफा शेख यांना फोन करून कारवाईचे निर्दैश देऊनही आरोपींच्या विरोधात कारवाईचा सोपस्कार म्हणजे एक प्रकारे महिला आयोगाच्या निर्देशाला नेकनुर पोलिसांनी हरताळ फासला आहे.

…. तर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाई होणार का?

कला केंद्र चालकाने गुंडांमार्फत स्थानिक पत्रकार अशोक काळकुटे यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला असला तरी सक्षम अधिकाऱ्यांमार्फत प्रकरणाची चौकशी करून दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी अशा भावना बीडच्या माध्यमांतून व्यक्त होत आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.