दहावी बोर्डाचा निकाल कधी काय म्हणाल्या शिक्षणमंत्री वाचा

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकताच सोशलमिडियाद्वारे माध्यमांशी संवाद साधात दहावी बोर्ड परीक्षेची तारीख जाहिर केली आहे.

0

शिरूर कासार, रयतसाक्षी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतिने मार्च, एप्रील २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोचली आहे. दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल दि.१५ रोजी जाहिर होणार असल्याची माहिती सोशल मिडियावरून व्हायरल करण्यात आल्याने विद्यर्थी, पालकांत उत्सकता होती.

 

मात्र मंडळाने तांत्रीक अडचणी अभावी निश्चित वेळेला निकाल जाहिर करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकताच सोशलमिडियाद्वारे माध्यमांशी संवाद साधात दहावी बोर्ड परीक्षेची तारीख जाहिर केली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी बोर्ड परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत मागील दोन वर्षापासून कोवीड १९ या महामारीशी संघर्ष केल्याने विद्यार्थ्यांना शैक्षणीक नुकसान सोसावे लागले. सर्व क्षेत्रातील व्यक्तींना कोविड कालावधीचा फटका बसला आहे. कित्तेक नागरिकांना जीव गमवावा लागला कोरोना महामारीने कित्तेक लहान थोरांसह वृद्धांना आपल्यापासून हिराऊन नेले. या आडचणींना तोंड देत रज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण् मंडळाने जाहिर केलेल्या दहावी – बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन मार्च, एप्रील २०२२ महिण्यात ऑफलाईन परीक्षा दिली.

 

नुकताच बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात आला. त्यानंतर आता दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. विद्यार्भी, पालकांची प्रतिक्षा अंतिम टप्यात आली असून शिक्षण मंडळाच्या वतिने शुक्रवारी (दि.१७) दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहिर करण्यात येणार आहे. दरम्यान, दुपारी १:००  नंतर शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी, पालकांना निकाल पहता येणार असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.