जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांची गय नाही

जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांवर कारवाईसाठी एसपींनी पोलिस निरिक्षकांना दिले अल्टीमेटम

0

बीड, रयतसाक्षी : बीड जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार घेताच पोलिस अधिकक्षक नंदकुमार ठाकूर हे गतीने कामाला लागले आहेत. पश्चिम महाराष्ट्रासह इतर राज्याला उसतोड मजुर पुरविणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख आहे. गळीत हंगाम संपल्याने उसतोड मजुर गावात स्थिरावले आहेत. उसतोड मजुर गावी परतताच इथल्या उद्योग व्यवसायांना सुगीचे दिवस येतात.

 

याचाच गैरफायदा उसतोड मजुरांसह सामान्य नागरिक, युवकांना लूटण्यासाठी काही निर्ढावलेल्या अवैध धंदेवाल्यांच्या टोळ्या सक्रीय होतात. अवैध धंद्यामुळे कौटुंबीक कलहामध्ये वाढ होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने येत्या आठ दिवसात जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. याशिवाय कारवाईसाठी त्यांनी विशेष स्पेशल पथक तैनात केले आहे.

 

कर्तव्यदक्ष, कार्यक्षम, कर्तव्यकठोर प्रशासक म्हणून बीड जिल्ह्याचे नुतन पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांची ख्याती आहे. जिल्ह्यात बिगाडलेली कायदा सुव्यवस्था, खुलेआम सुरू असलेले अवैध, वाढती गुन्हेगारी अशी अव्हानं त्यांच्या समोर आहेत. पण एक कुशल प्रशासक म्हणून परिचीत असलेले पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील ठाणेप्रमुखांकडून मुख्यालयी वातानुकूलीत चेंबरमध्ये बैठीद्वारे आढावा घेण्या ऐवजी प्रत्यक्ष ठाण्यांना भेटी देऊन कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यावर भर दिला आहे.

 

गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण व्हावा यासाठी टॉप ट्वेंटी गुन्हेगारांची यादी करून एमपीडीए, हद्दपारीच्या कारवाईचे आदेशही त्यांनी दिले आहेत. पोलिस अधिक्षकांच्या आदेशानुसार विवध पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांकडून गुन्हेगारांचे अहवाल मागविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी कौटुंबीक कलहाचे केंद्रबींदू ठरणारे अवैध धंदे येत्या आठडाभरात बंद करण्याचे निर्देश पोलिस निरीक्षकांना देण्यात आहेत.

 

ज्या पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध धंदे सुरू राहतील अशा ठिकाणी कारवाईसाठी विशेष स्पेशल पोलिस पथक तैनात करण्यात आल्याचेही पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगीतले. पोलिस प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी यासाठी काम करणार असल्याचे एसपी श्री. ठाकूर म्हणाले.

 

धोकेदायकपणे वाहन चालवणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार

अनेक जण कमी वेळेत अधिक पैसा कमविण्यासाठी आपल्या वाहनात क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी बसवून वाहतूक करता. या सर्व प्रकाराकडे एसपींनी लक्ष वेधले आहे. अशा प्रकारे धोकादायकपणे वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी संबधित पोलस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

निश्चित उसतोड मजुर महिलांचा संन्मान वाढेल

गळीत हंगाम संपल्याने उसतोड मजुर गावी स्थिरावताच उचली ( मुकादमाकडून देण्यात येणारी आगाऊ रक्कम )सुरू झाल्या आहेत आहेत. उसतोड मजुरांकडे पैसा आला की, जिल्ह्यातील आर्थीक गणिताला चालना मिळत असली तरी अवैध धंद्यामुळे मात्र कौटूंबीक कलहामध्ये वाढ होते. याचा अधिक त्रास उसतोड महिलांना सोसावा लागतो. त्यामुळे महिलांच्या सन्मानास ठेच पोहचते पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या कर्तव्यकठोर निर्णयामुळे निश्चितच उसातोड मजुरमहिलांचा सन्मान वाढेल हे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.