नुपूर शर्मावर बीड मध्ये गुन्हा दाखल, सर्व नेते एकत्र

टीव्ही चॅनलवर भावना दुखवनारे वक्तव्य भोवले, जिल्ह्यात पहिलाच गुन्हा

0

बीड, रयतसाक्षी: नुपूर शर्मा ने हजरत पैगंम्बर यांच्याविरूद्ध् अपशब्द वापरल्याने त्यांच्या विरोधात कारवाईसाठी देशभर अंदोलन, मोर्चे काढण्यात येत आहेत. सामाजीक रेट्यामुळे काही ठिकाणी गुन्हे ही दाखल करण्यात आले. कथित वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असलेल्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरूद्ध् बुधवारी (दि.१५) बीड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचे देशभरात पडसाद उमटत आहेत. बीडमध्येही तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

 

सर्वपक्षीय समाजबांधव, नेते मंडळींनी (दि.१) जून रोजी पोलिस अधिक्षकांची भेट घेउन कारवाईची मागणी केली होती. याबाबत कारवाई न झाल्याने बुधवारी (दि.१५) सर्वपक्षीय बांधवांच्या शिष्ठमंडळाने पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, उपअधीक्षक संतोष वाळके यांची भेट घेऊन गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. त्यानुसार शिष्ठमंडळाने शहर पोलिस ठाणे गाठले.

 

शिष्ठमंडळाच्या मागणी नुसार पोलिस निरीक्षक रवी सानप यांनी त्यांची फिर्याद नोंदवून घेतली. सय्यद अजिम खाजापाशा (२७) रा. शहेंशहानगर बीड, यांच्या फिर्यादीवरून भाजप नेत्या नुपूर शर्मा रा. फिरोजशहा रोड, नवी दिल्ली यांच्या विरूद्ध् कलम २९५ अ, ५०५ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान दि. २७ मे  रोजी रात्री ९:३० च्या दरम्यान एका टीव्ही चॅनलवरील कार्यक्रमात नुपूर शर्मा यांनी भावना दुखावणारे वक्तव्य केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तपास सायबर सेलचे पोलिस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्याकडे सोपिवण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.