धक्कादायक: पोटचा मुलगा झाला जन्मदात्याचा वैरी

एकत्रीत दारू ढोसून, कोयत्याने सपासप वार करून केला वडिलांचा खून

0

केज, रयतसाक्षी : तालुक्यातील साळेगाव येथे मंगळवारी (दि.१४) पारखे यांच्या माळावर मांगवडगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या पूर्वेला कोयत्याने सपासप वार करून वडिलांचा खून केला. खुना वाचा फुटू नये म्हणून प्रेत सोयाबीनच्या भुसकटात झाकून ठेवले. नंतर स्वतःयुसूफ वडगाव पोलीस ठाण्यात हजर होऊन खुनाची कबुली दिली. पोटच्या मुलाने जन्मदात्या वडिलांना माळरानावर नेऊन एकत्रीत बसून स्वत्:सह वडिलांनाही दारू पाजली दारूच्या नशेत असलेल्या वडिलांवर कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची धक्कादाय घटना उघडकीस आली आहे.

जवळबन येथील पवन शिवाजी हंकारे वय २६ वर्ष याने त्याचे वडील शिवाजी केशव हंकारे वय ५५ वर्ष यांना मंगळवारी दि.१४ दुपारी जवळबन येथून मोटार सायकलवर बसवून साळेगाव येथील गावच्या दक्षिण दिशेला निर्मनुष्य ठिकाणी पारखेचा माळ भागातील सदाशिव पारखे यांच्या गट नंबर २६५ मध्ये घेऊन गेला. त्या ठिकाणी दोघे एकत्र दारू पिले.

 

त्या नंतर पवन शिवाजी हंकारे हा त्याचे वडील शिवाजी हंकारे यास म्हणाला की, तुम्ही दारू पिऊन आईला त्रास का देता ? असा जाब विचारला. दुपारी २:३० ते ३:०० च्या दरम्यान दोघात बाचाबाची झाली. पवन हंकारे याने दारूच्या नशेत असलेल्या वडिल शिवाजी हंकारे यास अगोदर हाताने मारहाण केली. त्या नंतर कोयत्याने हातावर व पायावर सपासप वार केले. शिवाजी हंकारे हे दारूच्या नशेत असल्याने तो प्रतिकार करू शकले नाही.

 

पवन हंकारे याने त्याचे वडील शिवाजी हंकारे याच्या मानेवर आणि तोंडावर कोयत्याने सपासप एकून ९ ते १० वार केले. त्यामुळे अतिरक्तस्रावाने शिवाजी केशव हंकारे वय ५५ वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला. त्या नंतर मारेकरी मुलगा पवन हंकारे याने त्याचे वडील शिवाजी हंकारे याचे प्रेत तेथील सोयाबीनच्या भुसकटात संशय येऊ नये म्हणून झाकून खून ठेवले.

 

प्रेताची अवहेलना होऊ नये किंवा प्रेत सडून किंवा कुत्र्यासारखे प्राण्यांनी प्रेत कुरतडल्यास खुनाला वाचा फुटेल आणी आरोप अंगावर येईल म्हणून पवन हंकारे याने बुधवारी दि.१५ जून बुधवार रोजी दुपारी स्वतः युसुफवडगाव पोलीस ठाण्यात हजर होऊन वडिलांच्या खुनाची कबुली देत प्रेत केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत साळेगाव शिवारात लपवून ठेवल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांना दिली.

 

सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांनी ही माहिती तात्काळ सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, केज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना दिली. त्यानंतर तात्काळ सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील,पोलीस उपनिरीक्षक वैभव सारंग हे घटना स्थळी हजर झाले. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबत संतोष गित्ते,अशोक नामदास,बाळासाहेब अहंकारे,सचिन अहंकारे, घोरपडे,महादेव बहिरवाळ,उमेश आघाव शेख चाँद, शेटे, भुंबे, यादव आदी पोलीस कर्मचारी हजर होते.घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांनी भेट दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.