दहावी बोर्ड परीक्षेत मुलींचीच बाजी

औरंगाबाद विभागात १८ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण

0

औरंगाबाद, रयतसाक्षी : औरंगाबाद विभागाचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९६.३३ टक्के लागला आहे बारावी बोर्ड परीक्षाप्रमाणे दहावीतही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. ९७.५२ टक्के विद्यार्थीनी  उत्तीर्ण् झाल्या आहेत. तर विभगातील १८ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले आहेत.

 

औरंगाबाद विभागात ८५ हजार ५३३ विद्यार्थ्यांनी ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. तर एकून ५८ हजार ४४३ विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांहून अधिक गुण मिळविले. १८ अवद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. २३ हजार १०७ वद्यार्थ्यांनी ४५ टक्क्यांपूढील गुण मिळविले. तसेच तीन हजार ७५८ विद्यार्थ्यांनी ३५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविले. दहावीतही मुलींनीच बाजी मारली आहे. ९७. ५२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण् झाल्या आहेत.

 

राज्यातील निकालाची ठळक वैशिष्ट्ये

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण १५,८४, ७९० नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५,६८,९७७ विद्यार्थी प्रविष्ट  झाले असून त्यापैकी १५, २१, ००३ विद्यार्थी उत्तर्ण् झाले आहेत. व उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९४ आहे. या परीक्षेस राज्यातील नऊ विभगीय मंडळामधून एकूण ५४,१५९  पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५२.३५१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी ४१,३९० विद्यार्थी उत्तीर्ण् झाले आहेत. व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ७९.०६ आहे.

 

विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील, निकालाची प्रत देखील घेता येईल पुनर्मुल्यांकनासाठी ऑनलाईन पद्ध्तीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. त्यानंतर पाच दिवसांत शुल्क जमा करून ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.