बँक व्यवस्थनाच्या तुघलकी कारभाराविरोधात ज्येष्ठ नागरिकाचे उपोषण

उतारवायत वृद्धपकाळाचे मानधन रोखले, पीएम किसान निधीवाटपासही मज्जाव

0

शिरूर कासार, रयतसाक्षी: उतारवयात वृद्धांना औषधी खर्चासह उपजीवेकसाठी संजीवनी ठरणाऱ्या वृद्धपकाळ योजने अंतर्गत मिळणारे मानधन महाराष्ट्र ग्रामिण बँक शाखा पाटोदा व्यवस्थापनाने रोखले. या शिवाय पीएम किसान सन्मान निधी वाटपासह इतर बँकेच्या पत्राचा दुजोरा देत शारिरिक व्याधीने त्रस्त ज्येष्ठ नगारिक कॉ. महादेव नागरगोजे यांचे मानधन रोखल्याने उतारवयात त्यांच्यावर उपासमारीसह असाह्यतेत आरोग्याच्या समस्यांशी तोंड देण्याची वेळ आली आहे. बँक व्यवस्थापनाच्या तुघलकी कारभारा विरोधात कॉ महादेव नागरगोजे बेमुदत उपोषणा सुरू करणार आहेत.

 

ज्येष्ठांना वृद्धापकाळामध्ये शारिरिक व्याधीवर उपचारासाठी शासनस्तरावरून संजय गांधी वृद्धापकाळ योजने अंतर्गत मानधनाचा लाभ दिला जातो. दरम्यान, रिझर्व बँकेच्या नियमानूसार ज्येष्ठांना कर्ज वाटप करणे प्रतिबंधीत असल्याने कुठल्याच बँक शाखेतून ज्येष्ठांना कर्ज वाटप केले जात नाही. मात्र ज्येष्ठ नागरिक कॉ. महादेव नागरगोजे यांना वैद्यनाथ बँकेने मागील काही वर्षापूर्वी कर्ज दिले होते. त्यानुसार त्यांनी ऐपती प्रमाणे कर्जाची काही रक्कम भरली.

 

पण ऱ्हदयाच्या आजारामुळे त्यांच्याकडून उर्वरित कर्जाचे हाप्ते रोखले गेले. शासनाच्या वृद्धापकाळ व पीएम किसान निधी योजनेच्या लाभासाठी कॉ . महादेव नागरगोजे यांचे महाराष्ट्र ग्रामीण् बँके पाटोदा शाखेत बचत खाते आहे. मागील दोन महिण्यापूर्वी वैद्यनाथ बँकेने महाराष्ट्र ग्रामीण बँकेस थकित कर्जदारांच्या नावे मानधन रोखण्याचे पत्र दिले. त्यानुसार महाराष्ट्र ग्रामिण बँक पाटोदा शाखा व्यवस्थनाने कॉ. महादेव नागरगोजे यांच्या बँक खात्यावरील व्यवहार स्थगित केला. त्यामुळे कॉ. महादेव नगारगोजे यांना गेल्या दोन महिण्यापूसन योजनांच्या हक्काच्या लाभापासून वंचित रहावे लागले .

 

प्रत्यक्षात दिव्यांग, असाह्य, निराधार, ज्येष्ठ नगारिकांसाठी शासनस्तरावरून सुरू असलेल्या मानधन योजनांच्या लाभापासून वंचित ठेण्याचे अधिकार कुठल्याच बँक व्यवस्थापनाला नसताना वैद्यनाथ बँकेच्या पत्रावरून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने ज्येष्ठ नागरिक कॉ. महादेव नागरगोजे यांचे हक्काचे मानधन रोखून सबंध ज्येष्ठांच्या अस्थित्वावर घाला घातला आहे.

 

उतारवयात ज्येष्ठ नागरिकांची थट्टा मांडणाऱ्या वैद्यनाथ बँकेसह महाराष्ट्र ग्रामीण् बँक व्यवस्थापकांवर हक्कभंग दाखल करून हक्काचा लाभ देण्यात यावा या मागणीसाठी कॉ. महादेव नागरगोजे तहसील कार्यालयासमोर बेमुदत अमरण उपोषणास बसणार आहेत. विषेश म्हणजे कॉ. महादेव नागरगोजे यांची दोन वेळा हार्ट सर्जरी करण्यात आली असून मधुमेहा सारख्या भयान आजाराने त्रस्त असताना केवळ बँक व्यवस्थापकांच्या हेकेखोरीला लागाम घालण्यासाठी आंदोनाचा भयंकर मार्ग अवलंबिल्याचे कॉ. नागरगोजे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.