केंद्र सरकारच्या हुकूमशाहीचा काँग्रेसकडून निषेध्

बीडमध्ये जिल्हाध्यक्ष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने

0

बीड, रयतसाक्षी : केंद्र सरकार सुडबुद्धीने काँग्रेसच्या नेत्यांवर कारवाई करत असल्याच्या निषेधार्थ् आज बीड जिल्हा काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली. काँग्रेस पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. हे आंदोलन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या वेळी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 

काँग्रेसचे खासदार तथा युवा नेते राहुल गांधी तथा पक्षाच्या प्रमुख् सोनिया गांधी यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. केंद्र सरकार ईडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षावर सुड उगवण्याचा प्रयत्न करत असून ही केंद्र सरकारची हुकूमशाही आहे . या हुकूमशाहीच्या विरोधात आज बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाधाकरी कार्यालयामसोर तीव्र निदर्शने करण्यात आली. हे आंदोलन जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

 

या वेळी आदित्य पाटील, राहूल सोनवणे, रविंद्र दळवी, फरीद देशमुख, नवनाथ थोटे, ऍड गणेश करांडे, जयप्रकाश आघाव, संतोष निकाळजे, योगेश शिंदे, ईश्वर शिंदे, गणेश जवकर, विद्या गायकवाड, श्यामसुंदर जाधव, दादासाहेब तासतोडे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थित होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.