मोहटा गडावर आदीशक्ती- लोकशक्तीचा संगम

लोकनेत्या पंकजा मुंडे आज मोहटा देवी चरणी, हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा- पै. माऊली पानसंबळ

0

शिरूर कासार, रयतसाक्षी: मोहटा गडावर लोकनेत्या पंकजा मुंडे आज मंगळवार (दि.२१) मोहटा देवीच्या चरणी येत आहेत. मोहटा गडावर विविध विकास कामांचा आढावा यासह देवीचे आशीर्वाद घेण्यासाठी लोकनेत्या पंकजा मुंडे येत असल्याने आदीशक्ती- लोकशक्तीचा संगम होणार आहे. लोकनेत्या पंकजा मुंडे याच्या स्वागतास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे अवाहन पै. माऊली पानसंबळ यांनी केले आहे.

मोहटा गडाच्या तेजोमय विकासामध्ये लोकनेत्या मा. ना. पंकजा मुंडे यांचे कायम योगदान राहीले आहे. गडावर येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी लोकनेत्या पंकजा मुंडे नेहमीच अग्रही आहेत. गडाच्या विकास कामांसाठी राज्य व केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून लोकनेत्या पंकजा मुंडे यांनी गडाचा दैदिप्यमान विकास साधला आहे. सोई- सुविधांमुळे मोहटा गडावर येणाऱ्या भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे.

 

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेउन लोकनेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे होऊ घातली आहेत. मोहटा गडावर आदीशक्ती आणि लोकशक्तीचा संगम होणार असल्याने याचे साक्षीदार होण्यासाठी जिल्हाभरातील भाविक, कार्यर्त्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे पै. माऊली पानसंबळ यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.