अग्निपथ योजने विरोधात राष्ट्रवादी युवकचे आंदोलन

केंद्र सरकारचा निषेध, घोषणाबाजीने परिसर दणाणला

0

नांदेड, रयतसाक्षी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या केंद्रातील भाजपा सरकारने भारतीय सैन्यदलासाठी फसवी अग्निपथ योजना काढली आहे. ही योजना रद्द करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, नांदेड शहर जिल्हाध्यक्ष रऊफ जमीनदार यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहरातील आयटीआय चौक येथे सोमवारी (दि.२०) धरणे आंदोलन करण्यात आले.

 

केंद्रसरकारने भारतीय सैन्य भरती संदर्भातील अग्निपथ योजना काढलेली आहे. आग्नीपथ योजने विरोधात देशभरात असंतोष निर्माण झाला आहे. देशाच्या सुरक्षेविषयी फसवी योजना लागू करणाऱ्या केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरातील आयटीआय चौकात फुले दाम्पत्यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकाधिकारशाही चालणार नाही, मोदी सरकार हाय हाय अशी घोषणाबाजी करत सरकारचा निशेध करण्यात आला.

 

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, शहराध्यक्ष रऊफ जमीनदार, जिल्हा सरचिटणीस प्रा. डी.बी. जांभरूणकर, माजी विरोधी पक्षनेता जीवन पाटील घोगरे, शेख इनूस, अ‍ॅड. बाळासाहेब सोनकांबळे, आत्माराम कपाटे, दत्ता पाटील ढगे, कैलास इज्जतगावकर, हनमंत नरहरे, सुनील धुमाळ, संदीप क्षीरसागर, प्रमोद वानेगावकर, व्यंकटेश जोगदंड, आंबादास जोगदंड, माधव पाटील कदम, मोहसीन माळेगावकर, चैतन्य पाटील जाधव, सय्यद इलियास राजूरकर, लक्ष्मण फुलवळ, प्रवीण घुले, पंकज कांबळे, प्रभाकर भालेराव, अनिकेत भंडारे, कृष्णा पुयड, सुमेध सरपाते, विक्कीसिंघ गील, सुमीतसिंघ सुपारे, पिंटू सूर्यवंशी, गणेश गौर, मुकुंद शिंदे, ओम दांडेवाड, योगेश कर्‍हाळे, पाशा पाटील, कपिल पाटील, गजानन गोरखा, कैलास कदम, संदीप क्षीरसागर, मंगल मगरे, सिंधु देशमुख, मंगल लुंगारे, नंदा किजोळे, वंदना कोकाटे, अ‍ॅड. ज्योती तळणीकर, वंदना कोकाटे, परमजित कौर सोलापूरे, हसिना बेगम, माहेश्वरी गायकवाड, मो. मुबीन ताहेर, गुलाम सदगीर, सुमीत सरपे, ऋशी गहेलवाड, माधव चिंचाळे, जिलानी पटेल, महमदी पटेल, सईदा पटेल आदींनी सहभाग घेतला.

धनंजय सुर्यवंशी:  

भारताच्या रक्षणासाठी हजारो सैनिकांनी बलिदान दिले. दिवस-रात्र देशसेवेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता सिमेवर भारत मातेचे संरक्षण करणारे सैनिक आहेत. सौनिकांच्या शौर्याचे मूल्य पैश्याच्या स्वरूपात होणे शक्य नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अग्निपथ योजना काढून भारतीय जवानांचा अपमान केलेला आहे.

 

रऊफ जमीनदार:

मुस्लीम समाजाचे धर्मगुरू महंमद पैगंबर यांच्याबद्दल नुपूर शर्मा यांनी अपशब्द वापरलेला आहे. असे वक्तव्य करणाऱ्या माथेफिरू निपूर शर्मा यांच्यावर कार्यवाही करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.