केंद्राच्या आग्निपथ योजने विरोधात राष्ट्रवादी आक्रमक !

शिरूर राष्ट्रवादीचे तहसीलदारांना निवेदन, घोषणाबाजी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील भाजपा सरकारने भारतीय सैन्यदलासाठी फसवी अग्निपथ योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी  शिरूर कासार राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. युवकचे तालुकाध्यक्ष अविनाश सानप शहराध्यक्ष सागर गाडेकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी करत केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला. आंदोलनकर्त्या शिष्ठमंडळाने नायब तहसीलदार यांना मागण्यांचे निवेदन दिले.

 

केंद्र सरकारने भारतीय सैन्य भरती प्रक्रियेसाठी अग्निपथ या मृगजळा प्रमाणे फसव्या योजनेची घोषणा केली आहे. देशाच्या सुरक्षेविषयी फसव्या अग्निपथ योजनेची घोषणा करून ती आम्लात आणणे म्हणजे तरूणांची थट्टा आणि भारतीय सैनिकांचा अवमान आहे.

 

जाहिर केलेली फसवी अग्निपथ योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी युवकचे तालुकाध्यक्ष अविनाश सानप, शहराध्यक्ष सागर गाडेकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाच्या आवरात “ मोदी तेरी तानाशाही नही चलेगी, केंद्र सरकार हाय हाय, फसवी अग्निपथ योजना रद्द करा”  अशी घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी आंदोलनकर्त्या शिष्ठमंडळाने नायब तहसीलदार बाळासाहेब खेडकर यांना मागण्यांचे निवेदन दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.