कोणाला संधी मिळाल्या नंतर तिरस्कार करणे हे माझे संस्कार नाही- पंकजा मुंडे

पंकजा मुंडे यांची तहाची भूमिका, कार्यकर्त्यांना संयमाचा सल्ला

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : भाजपाने विधानपरिषदेवरील संधी नाकारल्यानंतर मौन पाळून असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी (दि.२१) मोहटा देवीचे दर्शन घेतले. त्या आज मौन तोडतील अशी अपेक्षा असल्याने मोठ्याप्रमाणावर कार्यकर्ते पंकजा मुंडे काय बोलतात हे ऐकण्यासाठी जमले होते. यास सर्व कार्यकर्त्यांसमोर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी संयम आणि तहाची भाषा केली. त्यामुळे आता पंकजा मुंडे समर्थकांना आपल्या आक्रमतेला थंड करावे लागणार आहे.

 

माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी मोहटा देवीचे दर्शन घेतले. मागच्या काही दिवसांपासून पंकजा मुंडेंचे समर्थक अस्वस्थ असून आज पंकजा मुंडे काही तरी भूमिका स्पष्ट करतील अशी समर्थकांना अपेक्षा आसल्याने अनेक कार्यकर्ते मोहटा गडावर जमले होते. मात्र पंकजा मुंडे यांच्या दौऱ्या आगोदरच राज्याच्या राजकारत मोठ्या प्रमाणावर घडामोडी सुरू झाल्या.

 

या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या भूमिकेकडे अधिक लक्ष लागले होते. मात्र पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयमाचे सल्ला दिला आहे. मोहटा देवीच्या दर्शना नंतर उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, माझा संयम लेचापेचा नाही, जे हार मुंडे साहेबांच्या सत्कारासाठी आणले होते, ते हार त्यांच्या अंत्यविधीला वापरले हे पाहणारी, पचवणारी आणि आक्रमक झालेल्या जनतेला शांत करणारी मी पंकजा मुंडे आहे.

 

आता पंकजा मुंडे काय सांगणार ? असा सर्वांना प्रश्न पडला, मात्र कोणाला संधी मिळाल्याने त्याचा तिरस्कार करणे हे माझ्यावरचे संस्कार नाहीत, ज्यांना मिळाले त्यांना खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद… पण मला या गोष्टीचं वाईट वाटतं की , तुमची मनातली घालमेल असल्याने तुम्ही प्रत्येक जण मला फोन करत होता पण मी तुमची क्षमा मागते तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केलं तुमच्या सोबत मी कायम राहील, निवडणूका येत असतात , जात असतात मात्र प्रेम करणाऱ्या लोकांची कधीही प्रतारणा केली नाही, त्यांच्या प्रेमाची उतराई होणे कधीही शक्य नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकले.

 

सगळ्याच लढाया करून जिंकायचे नसते काही तह करायचे असतात. तह करणे म्हणजे पराजित होणं नाही असा सुचक सल्ला देत पंकजा मुंडे यांनी संयम ठेवण्याचे संकेत दिल्याने समर्थकांना भावनांना आवर घालावा लागणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.