पितृछत्र हरपलेल्या सुरेखाचा ‘फादर्स डे’ ला विवाह

सामाजीक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांचे सपत्नीक कन्यादान

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : देशभरात सोमवारी (दि.२०) ‘फादर्स डे’ (पितृदिन) साजरा होत असताना सिंदफणा (ता. शिरूर कासार) येथे पितृछत्र हरपलेल्या सुरेखाचा शुभविवाह उरकण्यात आला. फादर्स डे ला पितृछत्र हरपलेल्या वधुचा विवाह सोहळा हा ऱ्हदयस्पर्शी क्षण, या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सामाजीक कार्यकर्ते आजिनाथ गवळी यांनी सपत्नी उपस्थित राहून कन्यादान केले.

 

तालुक्यातील सिंदफणा आश्रमशाळा गोमळवाडा येथे कै. यल्लाप्पा फुलमाळी व मालन यल्लाप्पा फुलमाळी यांची कन्या सुरेखा- अशोक यांच्या विवाहाचे सोमवारी (दि. २०) आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, पिंपळगाव (ता.जि. अहमदनगर) येथील धोंडीबा औटी यांचे पुत्र अशोक यांच्या शुभविवाह उत्साहात संपन्न झाला. सोशल मीडियासह देशभरात “फादर्स डे” साजरा होत असतानाच पितृछत्र हरपलेल्या सुरखाचा विवाह तो ही फादर्स डे (पितृदिन) अशा ह्रदयस्पर्शी विवाह सोहळा उपस्थितांचे डोळ्याच्या कडा पान्हवणारा ठरला.

 

गरीब, गरजु कुटूंबातील छत्र हरपलेल्या सुरेखा हिस असवांच्या लाटेवर स्वार होऊन सासरी जाताना पित्याची उनिव भरून काढणे शक्य नाही. पण सामाजीक बांधीलकी जोपासत सामाजीक कार्यकर्ते आजिनाथ गवळी, सिंदफणा अर्बनच्या चेअरमन वैशाली गवळी यांनी  पित्यास पोरख झालेल्या सुरेखाचे सपत्नीक उपस्थित राहून कन्यादान केले. या शिवाय आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतून आजिनाथ गवळी यांनी सुरेखास संसारपयोगी साहित्य सप्रेमभेट दिले. मोठ्या उत्साहात संपन्न होणाऱ्या या विवाह सोहळ्याचा ऱ्हदय स्पर्शी क्षण टिपण्यासाठी आलेल्या उपस्थितांचे डोळे पान्हावले होते.

 

विवाह सोहळ्यात सर्वत्र फादर्स डे आणि सुरेखाच्या हरपलेल्या पितृछत्राची तळमळीने चर्चा होती. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आजीनाथ गवळी यांचेसह सिंदफणा आश्रम शाळेचे सचिव श्री.भैय्या पालवे,शाळेचे मुख्याध्यापक किशोर गुंड,सरपंच,चेअरमन,ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक यांचेसह दोन्ही कडील पाहुणे मंडळी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

 

निराधारांचा आधार बनुन काम करण्यातच मोठे समाधान असून निराधार आणि दिनदुबळ्यासाठी काम चालुच ठेवणार.

आजीनाथ गवळी

 

श्रीमती मालनबाई यल्लाप्पा फुलमाळी यांनी स्वःतला मुलबाळ नसताना पतीच्या निधनानंतर न डगमगता आपल्या सवतीच्या दोन मुलींना भीक मागुन, मजूरी करून लहानचे मोठे केले. त्यांचे लग्नही करून दिले यापैकी एकीचे दोन वर्षापुर्वी तर सुरेखाचे सोमवारी मोठ्या उत्साहात लग्न झाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.