सार्वजनीक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता लाचेच्या जाळ्यात

कामाचे बील काढण्यासाठी स्वीकारली लाच, सा.बा.कार्यालतच एसीबीची कारवाई

0

अंबाजोगाई, रयतसाक्षी : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता ३० हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. संरक्षणासाठी पिस्तुल परवाना मागणाऱ्या कार्यकारी अभियंत्याने कामाचे बील काढण्यासाठी कंत्राटदाराकडून लाचेची मागणी करत ती स्वीकारली. दरम्यान, शहरातील सार्वजनीक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच लाचलूचपत  प्रतिबंधक विभागाच्या आधिकारी कर्मचाऱ्यांनी सापळा लावून कारवाई यशस्वी केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

 

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून एका कंत्राटदाराने केलेल्या कामाचे बील काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभग आंबाजोगाई चे कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे याने कंत्राटदाराकडे लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी कंत्राटदाराने बीडच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली . प्राप्त तक्रारीनुसार एसीबीच्या अधिकाऱ्यांनी खात्री करून बुधवारी (दि.२२) शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय परिसरात सापळा लावला. ठरलेल्या वेळेत तक्रादार कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यास लाचेची रक्कम ३० हजार रूपये घेवून कार्यालयात गेला.

 

दरम्यान, तक्रादार यांनी साक्षीदारासमक्ष लाचेची रक्कम कार्यकारी अभियंता याच्याकडे सूपर्द करताच दाब धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घालून लाचेच्या रकमेसह कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यास रंगेहाथ पकडले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच एसीबीच्या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे यांनी प्रशासनाकडे संरक्षणासाठी पिस्तुल परवाना मागीतला आहे.

 

परवाना मिळण्यापूर्वीच कार्यकारी अभियंता लाचखोर असल्याचे समोर आल्याने परवाना मिळण्याची आशा आता धुसर झाली आहे. कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे हे वादग्रस्त राहीलेले आहेत . प्रत्यक्षात यापूर्वी जिल्हाधिकारी यांना लिहलेले पत्र आणि त्यांची पिस्तूल ही प्रकरणे चांगलीच गाजली होती. आणि आता लाचेच्या प्रकरणाची त्यात भर पडली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.