एकनाथ शिंदेची ७ वाजता पत्रकार परिषद, मुख्यमंत्री पाच वाजता फेसबुक लाईव्ह

शिवसेनेच्या बंडाळीवर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष, एकनाथ शिंदेच्या भुमिकेकडे राज्याचं लक्ष

0

रयतसाक्षी : शिवसेनेचे मंत्री एकनाथ् शिंदे यांच्या बंडाळी नंतर राज्याच्या राजकारणात खलबते सुरू झाली आहेत. या प्रकरणात दिल्लीश्वरांनी हस्तक्षेप केल्यामुळे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ् शिंदे यांनी नुकतेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारींना आमदारांच्या सह्यांचे पत्र पाठवले आहे. दरम्यान,आपल्याकडील आमदारांना ऑनलाईन दाखविण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे वेळ मागवला असून सायंकाळी ७:०० ते  पत्रकार परिषद घेणार आहेत. त्याच बरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी ५: ०० फेसबुक लाईव्ह येणार आहेत.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत सहा मंत्र्यांसह ३४ आमदार आपल्या सोबत असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, विधानपरिषद निवडणूकीच्या मतदान प्रक्रियेनंतर एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गुजरातमधील सुरत मध्ये एका हॉटेलमध्ये पोहचले होते. सुरतमधील ज्या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे थांबले होते त्या हॉटेल परिसरास छावणीचे स्वरूप आले होते. मुख्यमंत्री उद्ध्व ठाकरे यांचा निरोप घेऊन मिलींद नार्वेकर सुरतला गेले होते. एकनाथ शिंदे यांची   मिलींद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा घडवून आनली. एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत सरकार स्थापनेचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे मांडला होता.

 

पण मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना समक्ष भेटून तोडगा काढण्याचा सल्ला देत प्रस्ताव स्वीरला जाणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार सुरतमधून आसामच्या गुवाहाटीकडे रवाना झाले. मंगळवारी रात्री बंडखोर आमदारांचे गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये फोटो सेशन झाले. यामध्ये नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर हे कॅमेऱ्यासमोर येण्यास धजावत नसल्याचे व्हिडिओद्वारे समोर आले त्याच बरोबर काही आमदार कॅमेऱ्यापासून दडत असल्याचे समोर आले होते. गटनेते पदावरून हटविल्या नंतर एकनाथ् शिंदे यांनी बंडखोर आमदारांच्या सह्याचे स्वतंत्र गट स्थापनेचे पत्र राज्यपाल यांना पाठवले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना व्हिप जारी केला त्यानुसार एकनाथ शिंदे यांनी एक त्रितीआंश बंडखोरीच्या संख्याबळाचा दाखला देत आपले गटनेते पद कायम असल्याचा दावा केला.

 

त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अँटीजीन टेस्ट पॉझीटीव्ह आल्याने ते सायंकाळी ५:०० वाजता फेसबुक लाईव्ह येणार आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार या विषयी बोलणार का? महाविकास आघाडी सरकारला कसलाही धोका नसल्याचे बोलणार याकडे लक्ष लागले आहे. दूसरीकडे बंडखोर एकनाथ शिंदे सायंकाळी ७: ०० वाजता आसामच्या गुवाहाटी येथून पत्रकार परिषद घेणार असल्याने एकनाथ शिंदे यांच्या भुमिकेसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्हकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.