फक्त शिवसैनिकांनी म्हणाव मी सर्वत्याग करायला तयार आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

माझ्याच लोकांना माझ्यावर विश्वास नाही. त्यांना मी मुख्यमंत्री नको आहे. मी त्यांना माझं मानतो पण ते मला त्यांचे मानत आहेत की नाही माहित नाही.

0

रयतसाक्षी : काँग्रेसच्या कमलनाथ, शरद पवार यांनी फोन करून सोबत असल्याचे सांगितले. त्यांचा हा माझ्यावरील विश्वास आहे. परंतु माझ्याच लोकांना माझ्यावर विश्वास नाही. त्यांना मी मुख्यमंत्री नको आहे. मी त्यांना माझं मानतो पण ते मला त्यांचे मानत आहेत की नाही माहित नाही. त्यांनी इथेच मला बोलून दाखवायला हवे होते. मी ओडून , ताणून खुर्चीला चिकटून बसणारा नाही. यामुळे नुकसान कुणाचे होत आहे. ज्यांनी मी नको आहे, त्यांनी ते समोर येवून सांगावे. मला माझ्याच लोकांमुळे जास्त वेदना होत आहेत.

 

मी राजीनाम्याचे पत्र तयार करून ठेवले आहे. आमदारांनी यावे माझ्या राजीनाम्याचे पत्र घेवून जावे. हा लाचारीचा प्रश्न नाही, मजबुरीचाही प्रश्न नाही मी कुटल्याही आव्हानाला घाबरणारा नाही. मी शिवसैनिकांना आव्हान करतोय. त्यांनी खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना राहिला नाही असे आरोप करू नयेत. त्यांच्यासाठभ् माझ्याकडे उत्तर आहे. त्यांनी मला विचारावे मी पक्षप्रमुख पद पण सोडायला तयार आहे. फक्त शिवसैनिकांनी सांगावे की, तुम्ही पदाच्या लायक नाहीत. असे मी सर्वांना अवाहन करतो. तुम्ही थेट सांगा उद्धव ठाकरे तुम्हाला नकोय. मी सर्वकाही सोडायला तयार आहे. असेही भावनिक साद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंड पुकारलेल्या शिवसेना नेत्यांना नाव न घेता घातली आहे.

 

पुढे बोलताना शिवसेना पक्षप्रमुख् उद्ध्व ठाकरे म्हणाले की, बोलण्यासारख्या गोष्टी खूप आहेत. कोव्हिड सोबत आपण लढलो. त्या कठीण काळामध्ये आपण त्यासोबत लढालो आहेत. प्रशासन माहिती नसलेल्या माणसाच्या वाटेला पहिल्या काळातच कोव्हिड आला. देशात झालेल्या सर्व्हेमध्ये टॉप मुख्यमंत्र्यांमध्ये आपले नाव होते. शिसेना बाळासाहेबांची आहे का? शिवसेनेने हिंदुत्व सोडले आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे मुख्यमंत्री भेटत नाहीत .

 

त्याचे कारण माझी शस्त्रक्रीया झाली होती हे त्याचे कारण होते. त्यामुळे कुठलेही कामे बंद नव्हती. मी ऑनलाईन बैठका घेत होतो. शिवसेना आणि हिंदूत्व हे घट्ट एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत. शिवसेना हिंदूत्वासाठी कुणीकुणी काय केले हे बोलण्याचे वेळ नाही . विधानभवनात हिंदूत्वाबद्दल बोलणारा मी पहिला व्यक्ती आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेत आणि आत्ताच्या शिवसेनेत काहीच बदल नाही. त्यांचेच विचार पुढे नेत आहोत. आजही हिंदू आहोत, उद्याही हिंदूच राहणार आहोत. स्वबळावर ६४ आमदार निवडूण आणणारी हीच ती शिवसेना आहे.

 

मी स्वत्: मुख्यमंत्री आहे सध्या राज्यात काय चालले आहे याची सर्वांना कल्पना आहे. शिवसेनेचे आमदार गायब झाले. आगोदर सुरत नंतर गुवाहाटीला गेले. या बद्दल मी काहीही बोलणार नाही हे बाळासाहेबांना पटत नव्हतं, मलाही पटत नाही कसलाही अनुभ्व नसताना मी जबाबदारी जिद्दीने पार पाडण्याचे काम करत आहे. बाळासाहेबांचेच विचार घेवून पुढे जाणार आहे. शरद पवार साहेब, सोनिया गांधी यांनी माझ्यावर विश्वास टाकला, कुठलाही अनुभव नसलेला व्यक्ती मुख्यमंत्री झाला. परंतु उगीच मध्ये रडकुंडीचा घाट आणला जात आहे. हे असे राजकारण कुणाच्याही फायद्याचे नाही.

 

प्रशासनाने पण मला खुप सहकार्य केलेले आहे. मी राजीनामा पत्र तयार करून ठेवले आहे. मी मुख्यमंत्री नको असेल तर शिवसैनिकांनी आणि ते राजभवनात घेऊन जाव या शिवाय मी पक्षप्रमुख पदाचाही त्याग करायला तयार आहे, पण् हे शिवसैनिकांनी म्हणावं असही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुकद्वारे  यांनी बंडोखोर आमदारांचे नाव न घेता म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.