शिवसेना मविआ मधून बाहेर पडण्यास तयार पण …. संजय राऊत

असा सल्ला त्यांनी बंडखोर आमदारांना दिल्याने राजकिय घडामोडीत एक नवा ट्वीस समोर आला आहे.

0

रयतसाक्षी: तुमचं म्हणणं आहे ना , आघाडीतून बाहेर पडा, नक्की विचार करू, पुढच्या २४ तासात बंडखोर आमदारांनी मुंबईत यावं, तुमची अधिकृत भूमिका शिसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे मांडावी. तुमच्या मागणीचा नक्की विचार केला जाईल, अस  मोठ वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केल आहे. मोबाईल व्हॉट्सअवरून तुमच्या मागण्या मांडण्यापेक्षा समोर येऊन ज्या मागण्या आहेत त्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडा असा सल्ला त्यांनी बंडखोर आमदारांना दिल्याने राजकिय घडामोडीत एक नवा  ट्वीस समोर आला आहे.

 

शिसवेनेतील बंडखोर आमदार २४ तासांमध्ये मुंबईत आल्यास शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करेल, असे खळबळजनक वक्तव्य  संजय राऊत यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

 

पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली ही भूमिका वैयक्तिक आहे, पक्षाची भूमिका नाही, असे स्पष्ट केले. मला समजत नाही की, शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडणार म्हणजे ते भाजपसोबत जाणार आहेत का? गुवाहाटीत शिवसेनेचे ४५ आमदार जमल्याचे फोटो पाहून शिवसेना दबावाखाली ही भूमिका घेत आहेत का? महाविकास आघाडीतून बाहेर पडून उद्धव ठाकरे भाजपसोबत जायला तयार आहेत का? अशा प्रश्नांची सरबत्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. कालच्या भाषणात उद्धवजी असे काही बोलले नाहीत.

 

ते काही आमदारांच्या दबावाखाली असा निर्ण्य घेतील, असे मला वाटत नसल्याचेही पृथ्वीराज चव्हाण् यांनी म्हटले. शेवटी हा शिवसेनेचा अंतर्गत विषय आहे. याबाबत नर्ण्य शिवसेनेनेच घ्यायचा आहे, आमच्या हातात काहीच नाही. काँग्रेस पक्षात याबाबत अद्याप चर्चा झालेली नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.