शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नांदूर घाट येथ्ल प्रकार, नैराश्येतून गळफास घेतल्याची चर्चा

0

केज, रयतसाक्षी: केज तालुक्यातील नांदूर घाट येथे बुधवारी दि.२२ केज तालुक्यातील नांदूर घाट येथे बुधवारी (दि.२२) सायंकाळी मधुकर निवृत्ती जाधव वय ७० वर्षे यांनी शिवारातील जांभळबेटा मधील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

 

नांदूर घाट येथील मधुकर जाधव यांनी जांभळबेटा परिसरातील बाभळीच्या झाडला गळफास घेतल्याची माहिती गुरूवारी (दि.२३) सकाळी नांदूर घाट पोलिस चौकीस देण्यात आली. दरम्यान सकाळी शेतात जाणाऱ्या लोकांना गळफास घेतल्याचे दिसून आले.

 

प्राप्त माहिती नुसार पोलिस चौकीत कर्तव्यावर असलेले पोलिस जमादार श्री. भालेराव व रशीद शेख यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनाम केला शवविच्छेदनासाठी प्रेत नांदूर घाटच्या ग्रामीण रूग्नालयात पाठवले आहे. मधुकर जाधव यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. परंतु नैराश्येतून आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तपास पोलिस जमादार श्री. भालेराव, पोलिस नाईक रशीद शेख हे करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.