बीडच्या भूमीअभिलेख कार्यालयात एसीबीचा ट्रॅप

भूकरमापक शेख अब्दुल लाचेच्या जाळ्यात

0

बीड, रयतसाक्षी : शहरातील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापक शेख अब्दुल अतिख वय ३८ वर्षे रा. ताकडागाव रोड, गेवराई, ता. गेवराई याने तक्रारदारास एक  हजार रूपयांची मागणी केल्या प्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून गुरूवारी (दि.२३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तक्रारदार यांचे आईचे नावे चौसाळा येथे असलेल्या प्लॅटची मोजणी करून हद्द कायम करून घेण्यासाठी शासकीय चलन भरून भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज केला होता. आरोपी भूकरमापक शेख अब्दुल अतिम याने प्लॉटची मोजणी मार्च २०२२ मध्ये करून हद्द कायम करून दिली.

 

केलेल्या कामाकरिता १७ जून २०२२ रोजी दोन मजुरांची मजुरी प्रत्येकी ५०० रूपये असे एक हजार रूपेय लाचेची मागणी केली. गुरूवारी दि. २३ लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक अमोल धस यांनी भूमिअभिलेख कार्यालयात सापळा लावून भूकरमापक अब्दुल शेख यांना ताब्यात घेतले.

 

दरम्यान  एक हजार रूपये लाच रक्कम स्वीकारण्याचे अब्दुल शेख याने मान्य केले याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान बुधवारी दि. २२ आंबाजोगाई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लाचेच्या जाळ्यात आडकला होता. त्यानंतर दूसऱ्याच दिवशी शहरातील भूमिअभिलेख् कार्यालयातील भूकरमापक अब्दुल शेख लाचेच्या जाळ्यात अडकल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.