तळेगावच्या शेतवस्तीवर सशस्त्र दरोडा

माय लेकरास मारहाण, सोन्याचे दागीने पळविले पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांची घटनास्थळी भेट

0

बीड, रयतसाक्षी: तालुक्यातील तळेगाव शिवारातील शेतवस्तीवर बुधवारी दि. २३ पहाटे दरोडेखोरांनी घरात प्रवेश करत माय लेकरास काठीने, लोखंडी रॉडने मारहाण करत पाच ग्रँम वजनाचे सोन्याचे दागिने पळविले. जखमी माय लेकरास उपचारार्थ बीड च्या खासगी रूग्नालयात दाखल करण्यात आले असून माहिती मिळताच पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळी भेट दिली असून दरोडेखोरांच्या शोधासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

 

तळेगाव येथील अनिता चंद्रकांत गायकवाड वय ५० वर्षे व संदेश चंद्रकांत गायकवाड वय २३ वर्षे हे माय लेकरं तळेगाव शिवारात शेतवस्तीवर राहतात. बुधवारी दि.२३ पहाटे त्यांच्या घराचा दरवाजा वाजविल्याने त्यांनी दरवाजा उघडला असता तिन दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी घरात प्रवेश करताच आनिता गायकवाड व संदेश गायकवाड या माय लेकरांना काठी, लोखंडी रॉडने जबर मारहान केली. एकून पाच दरोडेखोर असल्याने हे मायलेकार प्रतिकाराच्या प्रयत्नात नव्हेते. ओळख पटवू नये म्हणून दरोडेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते.

 

दरोडेखोरांनी आनिता यांच्या घरातील पाच ग्रँम वजनाचे मंगळसुत्र लुटून नेले. जखमी मायलेकरास उपचारासाठी बीड च्या खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पोलिस प्रशासनास माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी  घटनास्थळी भेट दिली. अतिरिक्त पोलीस अधिक्षक लांजेवार, उपविभागिय पोलिस अधिक्षक संतोष वाळके, ग्रामीण पोलिस ठाण्याचे आवारे, साबळे, बडे यांच्यासह आदी पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोरांच्या शोधासाठी श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

 

… अन दरोडेखोरांच्या हल्यातून अनर्थ टळला

पहाटे दरोडेखोरांनी गायकवाड यांच्या घरात प्रवेश करत हल्ला चढविल्या नंतर याती एक दरोडेखोर दूसऱ्या दरोडेखोरास आनितास मारण्याचे सांगत होता. चाकू घेऊन तो दरोडेखोर आनिता यांच्या पोटावर वार करणार तेवढ्यात आनिता यांनी मला मारून काय भेटेल, मला मारू नका अशी विनवणी केली असता चाकू उगारणाऱ्या दरोडेखोराने आनिता यांची विनवणी ऐकली आणि त्यांच्या गळ्यातील मंगळसुत्र व अन्य दागिने ओरबाडले. आनिता यांच्या विनवणीमुळे दरोडेखोरांच्या हल्ल्यात अनर्थ टळला

 

अंकुश नगर भागात घरावर दगडफेक

शहराच्या अंकुश नगर भागातील घरावर रात्रीच्या वेळी दगडफेकीची घटना घडली आहे. दरम्यान चोरट्यांनी दगडफेक केल्याचे सांगण्यात येत असून घटनेची माहिती शिवाजी नगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गस्त वाढविली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.