बीडच्या युवा शेतकऱ्याची राजकिय घडामोडींवर राज्यपालांकडे मागणी

मला प्रभारी मुख्यमंत्री करा, राज्यपालांना पत्र तर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0

बीड, रयतसाक्षी : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करत सरकार स्थापनेसाठी पुरेशा संख्याबळाचा दावा केले आहे. राज्याच्या राजकियक्षेत्रात घडामोडींना उधान आलेले असतानाच बीडच्या युवा शेतकऱ्याने पत्राद्वारे राज्यपालकांकडे अजब मागणी केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे राज्यातील प्रश्नांकडे लक्ष नसल्याने मला मुख्यमंत्री करा, अशी मागणी शेतकरी युवकाने राज्यपालांना पत्र व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कली आहे.

 

बीड जिलह्यातील दहिफळ वडमाऊली (ता. केज) येथील श्रीकांत गदळे या शेतकऱ्याने राज्याच्या राजकारणातील घडामोडींवर अजब मागणी करत राज्यपालांना पत्र लिहीले आहे. जिल्हाधिकारी यांनाही निवेदनाद्वारे युवा शेतकऱ्यांनी मागणी केल्याने सर्वक्षेत्रातून अश्चर्य व्यक्त केले जात आहे. या पत्राद्वारे शेतकऱ्याने लिहिले आहे की,  मी १० ते १२ वर्षापासून राजकारण, समाजकारणात अग्रेसर आहे . सध्या महाराष्ट्रात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे.

 

परंतू सरकारने तात्काळ मदत करणे अपेक्षीत होती. मात्र, ती मदत मिळाली नाही. तसंच मुख्यमंत्री यांनी आडिच वर्षे सत्तेत राहून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. राज्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सत्तेत राहून कोणत्याही प्रकारची मदत शेतकऱ्यांना आकरण्यात आली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना काळजीवाहू अथवा प्रभारी मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती न देता मला प्रभारी मुख्यमंत्री म्हणून संधी द्यावी, अशी मागणी श्रीकांत गदळे या शेतकऱ्याने राज्यपालांकडे पत्राद्वारे तर जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.