पावसाच्या हूलकावणीने शेतकरी चिंतेत

शिरूर तालुक्यात कापुस लागवड अंतिम टप्यात, उपयुक्त पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या

0

शिरूर कासार, रयतसाक्षी: मान्सुमचे आगमन उशीरा झाल्याने यंदा खरिप हंगामास पंधरा दिवस उशीरा सुरूवात झाली. समाधानकारक पाऊस नसला तरी तालुक्यात कपासी लागवड अंतिम टप्यात असून पुरेशा पावसा अभावी पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतेत आहेत. हवामान बदलामुळे पावसाची उघडीप चिंतेचा विषय ठरत असून तालुक्यातील बळीराजा पेरणीयोग्य पावसाच्या प्रतिक्षेत आहे.

 

मोजक्या पावसाच्या भरवश्यावर आठवडाभरापूर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिप मशागतीला सुरवात केली. नगदी पिक म्हणून शेतकऱ्यांनी यंदा कापुस पिकास पसंती दिल्याने तालुक्यात ४० हजार हेक्टरावर कापुस लागवड अंतिम टप्यात आहे. खरिपातील बाजरी, तुर, सोयाबीन, उडीदासह आदी पिकाच्या पेरणीसाठी पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.

 

खरिप मशागतीसाठी नामांकीत कंपणीच्या खत-बीयाणे खरेदीसाठी कृषी निविष्ठा विक्रेत्यांची दुकाने शेतकऱ्यांच्या गर्दीने फुलून गेली आहेत. आठवडाभरा पूर्वी पहिल्या पावसाने हजेरी लावल्याने पेरणी पूर्व मशागती सुरू असतानाच दुसऱ्यांदा दमदार पावसाने हाजेरी लागवली. त्यामुळे संभाव्य काळात पावश्याच्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी कापुस लागवड केली.

 

पावसाने दडी मारल्याने कापुस लागवड झाली पण पेरण्या खोळंबल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण् झाले आहे. तालुक्यात जागो जाग पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत बहूतांश शेतकरी आता पेरणीस धजावत नसल्याचे चित्र आहे. कृषी तज्ज्ञांकडून पेरणीस घाई नको असा सल्ला देण्यात येत असला तरी खरिप हंगामास उशीरा सुरवात झाल्याने बहूतांश शेतकऱ्यांनी नशिबावर सोपवून चाढ्यावर मुठ ठेवली आहे.

 

कापुस लागवडी नंतर दोन- चार दिवसाच्या फरकावर अधून मधून पावसाची अवश्यकता असते. त्यातच दोन दिवसापासून हवामान बदलाने वाऱ्याचा गती वाढल्यामुळे उगवन क्षमतेतील कापुस पिकावरही आसमानी संकट घोंगावत आहे. दमदार पावसाच्या प्रतिक्षेत तालुक्यात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्याने पेरणी पूर्व मशातीत मग्न शेतकऱ्यांच्या नजारा आभाळाकडे लागल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.