गर्भलिंग निदान , गर्भपात प्रकरणात धक्कादायक खुलासे

अंदाजे गर्भलिंग निदान करून महिलांच्या जीवाशी खेळ

0

रयतसाक्षी : बीड जिल्ह्यातील अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान प्रकणात आता नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपी जिल्हा कारागृहात असून यातील शिकाऊ कथित डॉ. सतीश सोनवणे याची आरोग्य विभागाने कसून चौकशी केली असता धक्कादायक खुलासे समोर आल्याचे विश्वासनिय सुत्रांकडून समोर आले आहे.

 

असे होते शीतल गाडे प्रकरण

सीताबाई उर्फ शीतल गणेश गाडे वय ३० वर्षे रा. बक्करवाडी, ता. बीड या महिलेचा दि. ५ जून रोजी मृत्यू झाला होता. शीतल यांना अगोदरच तीन मुली आहेत. त्यां चौथ्यांदा गर्भवती होत्या, परंतु रविवारी अचानक त्यांना रक्तस्त्राव सुरू झाल्याने पहिल्यांदा खासगी आणि तेथून जिल्हा रूग्णालयात त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. यात हा अवैध गर्भपात असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी पती, सासरा,भाऊ, मनिषा सानप नावाची आंगणवाडी सेविका, लॅबवाला कथित डॉ. सतीश सोनवणे यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशीत अरोपींनी अत्यंत धक्कादाय खुलासे केले आहेत.

कथित डॉ. सोनवणे याचा नवा खुलासा

आरोपी डॉ. सतीश सोनवणे याच्या म्हणण्याप्रमाणे अवैध गर्भलिंग निदानाचा कार्यक्रम हा नियोजन बद्ध् होता परंतु सर्व काही अंदाजानेच चालत असल्याचेही सांगण्यात आले आहे. मुळात शिकाऊ डॉ. सतीश सोनवणे यालाही सोनोग्राफी मशीन मधील  फारसे समजत नव्हते, त्याला एजंट मनीष सानपनेच शिकवले असल्याचा खुलासा करण्यात आला असून ते दोघे मिळूनच एखाद्या महिलेची सोनोग्राफी करीत असत आणि तीन ठिपके दाखवले तर मुलगी समजायचे , अन दोन ठिपके दाखवले तर मुलगा समजून अंदाजे हा सर्व प्रकार चालत असल्याचे आराग्य विभागास दिलेल्या जबाबत शिकाऊ डॉ. सतीश सोनवणे यांनी सांगितले. या प्रकरणाबाबत आरोग्य विभागाने न्यायालयात स्वतंत्र केस दाखल करण्याचा निर्णय घेतला असून यासाठी आरोपी शिकाऊ डॉ. सतीश सोनवणे याचा जबाब घेण्यात आला आहे.

 

प्राधिकृत अधिकारी डॉ. महादेव चिंचोळे यांनी बीडच्या कारागृहात जाऊन जबाब घेतला आणि या जबाबत त्याने अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा केला आहे. जालन्याचे डॉ. गवारे यांच्याकडूनच हे सर्व शिकल्याचे सोनवणे याने कबुल केले तसेच सोनवण् यांनी कबुली जाबाबत आपण गर्भलिंग निदान करीत होतो असे ही म्हटले आहे.

 

तर ठिपक्यावरून गर्भलिंग निदान अशक्य! 

शीतल गाडे प्रकरणातील आरोपी सतीश सोनवणे याने दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, तीन ठिपके आले की मुलगी आणि दोन ठिपके आले की मुलगा या अंदाजाला चुकीचे मानले असून ठिपक्यावरून गर्भलिंग निदान करणे शक्य नाही. उगाच काहीतरी सांगून लोकांची दिशाभूल केली जात असेल असा अंदाज बीडच्या जिल्हा रूग्णालयातील रेडिओलॉजिस्ट डॉ. संतोष जैन यांनी व्यक्त केला आहे.

 

गर्भपात करण्यासाठी शीतल कोणासोबत गेवराईला गेली.

घरच्यांच्या दबावापोटी शीतल गाडे यांना गर्भपात करण्यास भाग पाडले गेले आणि ठरल्याप्रमाणे भल्या पहाटे शीतल आणि तीचा सासरा सुंदर गाडे हे दुचाकीवरून भल्या सकाळीच गेवराई येथे पोहचले. गर्भलिंग तपासणीसाठी २५ हजार रूपये शुल्क ठरलेला होता. शितलचा सासरा सुंदर गाडे याने हे शुल्क कमी करण्याची विनंती केली मात्र मनीषा सानपने रेट फिक्स असल्याचे सांगितले.

 

एका खासगी रूग्णालयाचा पत्ता त्यांना दण्यात आला आणि तेथून मनीषा सानप त्या दोघांना घेऊन तीच्या तीन मजली घरी घेऊन गेली. त्या घरी कथीत डॉ. सतीश सोनवणे हा अगोदरच तयार होऊन बसला होता. अवघ्या दहा मिनिटात सुंदर गाडे कडून २५ हजार रूपये घेतले. तसेच गर्भपातची लिंक ही मनिषाने दिल्याचे शीतलचा सासरा आरोपी सुंदर गाडे याने त्याच्या जबाबात म्हटले असल्याचे समोर येत आहे.

 

४० ते ५० महिलांची गर्भलिंग तपासणी केल्याचे उघड

जालन्याचे डॉ. गवारे यांना अटक झाल्यानंतर मार्च २०२२ पासुन सतीश सोनवणे हा गेवराईत येऊ लागला. त्याला सोनोग्राफीसाठी दहा हजार रूपये मिळत होते. साधारण तीन ते साडेतीन महिन्यात त्याने जवळपास ४० ते ५० महिलांची तपासणी केली असल्याचे त्याच्या जबाबत त्याने म्हटले आहे. एवढ्या कमी कालावधीत त्याने तब्बल पाच लाख रूपये कमावले आहेत.

 

शीतल गाडे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याच्या मागणीने का धरला जोर

मृत शीतल गाडे प्रकरणातील गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणाची सी.आय.डी . मार्फत चौकशी करावी, तपासात हलगर्जीपणा बद्दल सहाय्यक पोलिस नरिक्षक बाळासाहेब आघाव यांना निलंबी करा, संबंधित प्रकरणातील आरोपींची व नातेवाईकांची संपत्तीची लाचलूचपत प्रतिबंधक  विभागामार्फत चौकशी करा, मृत नर्स सीमा डोंगरे हिची आत्महत्या की हत्या? याची सखोल चौकशी करा अशा मागण्यांनी आता चांगलाच जोर धरला आहे. या प्रकरणातील तपासात विविधता आढळॅन येत असल्याचे आणि तसेच आरोपींना पाठीशी घातल असल्याचा आरोप सामाजीक कार्यकर्त्यांनी केला आहे.

 

बक्करवाडीत नेमके किती झाले अवैध गर्भपात?

शीतल गाडे या महिलेचा अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात झाल्या कारणावरून तिचा हाकनाक जीव गेला आणि बीड जिल्ह्यातील छुप्या पद्धतीने सुरू असलेले गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचे रॅकेट समोर आले. मात्र एकटी शीतल गाडेच या घटनेची शिकार आहे का? तर नाही अशा असंख्य महिलांना त्याच्या मनाच्या विरूद्ध जावून त्यांचा गर्भ रिकामा करावा लागला तर काही महिलांना आपला जीवही गमवावा लागला.

 

मात्र त्या महिलांना न्याय मिळाला नाही. एकट्या बक्करवाडी येथील झालेल्या गर्भपाताची चौकशी झाली तर पायाखालची जमीन सरकेल एवढे प्रकरणं समोर येतील असा दावा येथील स्थानिक लोकांनी केला आहे. तर मग जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात खूप मोठी साखळी परत उघड होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. मात्र खरच या सर्व प्रकरणाला सी.आय.डी . कडे सोपवले जाणार का? बक्करवाडी गावच्यसा स्थानिकांच्या म्हणण्याला गांभीर्याने घेतले जाणार का? या सर्व प्रकरणाला प्रशासन कोणत्या पद्धतीने हाताळते याकडे मात्र राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.