शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक

0

रयतसाक्षी: शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकिय पेचप्रसंगाने महाविकास आघाडी सरकारची चाक अवघड घाटाच्या वाकड्या वळणावर रूतून बसली आहेत. शिवसेनेकडून विधानसभेच्या उपाध्यक्षांना एकनाथ शिंदे गटातील बारा बंडखोर आमदारांवर कारवाईचे पत्र देण्यात आले असून त्यांची सुरक्षा काढून घेतल्याने शिंदे गटात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यातच आज शिवसेने राष्ट्रीय कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलाविली असून ठाकरे सरकार समोरील पेचप्रसंगा बाबत महत्वाचे निर्णय होणार असल्याचे संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

शिवसेना कोणीही हायजॅक करू शकत नाही, वाघ मानता ना,  बकरी सारखं बॅ.. बॅ.. करू नका, भिखाऱ्या सारखं फिरू नका – संजय राऊत

महाविकास आघाडी सरकार टिकविण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा हे सरकारी निवास्थान सोडल्या पासून मातोश्रीवर मॅराथॉन बैठका सुरू आहेत. ठाकरे सरकारवरील बंडखोरीचे आरीष्ठ घालविण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसार्वा शरद पवार मैदानात उतरले आहेत. बंडखोर आमदारांना मुंबईत यावेच लागेल या शरद पवारांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री नारायण राने यांनी बंडखोर आमदारांच्या केसालाही धक्का लागता कामा नये अन्यथा घरी जाता येणार नाही असे शरद पवार यांना धमकी वजा ट्टीट केल्याने सोशल मिडीया ढवळून निघाली.

 

राजकिय आकसापोटी आमदारांच संरक्षण काढलं, त्यांच्या कुटूंबाच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची- एकनाथ शिंदे  

शिवसेनेकडून प्रपोदाच्या नियुक्ती नंतर शिंदे गटातील बारा बंडखोर आमदारांवर कारवाईचे पत्र विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले. या शिवाय त्या बारा आमदारांची सुरक्षाही काढून घेण्यात आल्याने शिंदे गटात चांगलीच खळबळ उडाली आहे. शिंदेगटाकडून कायदेशीर प्रक्रियेची वल्गणा करण्यात येत असली तरी शिवसेनेकडून पक्षा विषयी कायदेशीर बाबी पूर्ण् करण्याचा सपाटा लावला आहे . कालच शरद पवार, उध्दव ठाकरे, जयंत पाटील, संजय राऊत यांच्यात मातोश्रीवर दोन तास खलबते झाली.

 

बैठकीतील मुद्दे माध्यमांसमोर आले नसले तरी आजच्या एकून हालचालीवर लक्ष वेधले असता महाविकास आघाडी सरकार टिकविण्यासाठी तिन्ही पक्षांकडून आरपारच्या लढाईचे संकेत मिळत आहेत. खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिंदे गटास उद्देशून वाघ आहेत तर भिता कशाला उगाचच शेळी सारखे बॅ..बॅ करू नका, मुंबईत या भिखाऱ्या सारखे फिरू नका वक्तव्य करत महाविकास आघाडी सरकारकडे पूर्ण् बहूमत असल्याचे सांगत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना या झमेल्यात पडून प्रतिष्ठा धुळीस मिळवून घेऊ नये अन्यथा सकाळच्या शपविधीने भाजपची प्रतिष्ठा गेली आता सायंकाळचा शपथविधी होईल आणि राहीलेली भाजपची सर्वच प्रतिष्ठा धुळीस मिळेल, शिंदेगटा विषयी आमचा आपसातला मामला आमच आम्ही बघू असा सल्ला देत बंडखोर आमदार मुंबईत येतील तेव्हा खेला होवे असा खोचक टोलाही लगावत राऊत यांनी माध्यमांसह राजकिय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

 

ईकडे शिंदेगटातील बारा आमदारांवरील कारवाईच्या टांगत्या तलवारीमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. बंडखोर बारा आमदारांची सुरक्षा हटवल्याने एकनाथ शिंदे यांनी माध्यमा समोर येऊन राजकिय आकस बद्धीने आमदारांवर कारवाई प्रस्तावीत करण्यात आली असून आमदारांची सुरक्षा काढून त्यांच्या कुटूंबीयांची सुरक्षा धोक्यात आणली जात असली तरी आमदारांच्या कुटूंबीयांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असल्याचे म्हणत सुरक्षे विषयी ठाकरे सरकाच्या डोक्यावर हात ठेवले.

 

कायदेशीर बाबींच्या पुर्ततेसाठी शिवसेनेने आज राष्ट्रीय कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीत पक्षाचे महत्वाचे निर्णय होणार असल्याचे संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.

 

शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पक्ष संघटनासह सरकार टिकविण्यासाठी महत्वाच्या बाबींवर आज राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे. या बैठकीस जिल्हाप्रमुख, नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांची उपस्थिती रहाणार आहे.

 

…तर शिंदे गटास इतर पक्षात विलीन व्हावे लागेल

संविधानाच्या परिशिष्ठ दहा च्या तरतुदी नुसार शिंदे गटाकडे एक तृतिआंश एवढे बहूमत असले तरी पक्ष घटने नुसार बंडखोर शिंदे गटास भाजप अथवा प्रहास पक्षामध्ये विलीन व्हावे लागणार असल्याचे शिवसेना नेत्या निलम गोरे यांनी गुरूवारी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.