शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत

सिंदफणा पात्रात तोफांची सलामी, भानुदास एकनाथ, माऊली.. माऊली, च्या नामघोषात दुमदुमली शिरूर नगरी

0

शिरूर कासार, रयतसाक्षी: भानुदास एकनाथ नामाचा गजर करत पंढरपुरला सावळ्या विठूरायाच्या भेटीस  निघालेला शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांच्या वैष्णवांचा पालखी सोहळा सकाळी शहरात दाखल झाला. परंपरेनुसार शहरवासीयांनी सकाळी शिवभेटीने पालखीचे जंगी केले. शहरात आगमन होताच पालखी सोहळ्याच्या स्वागताच तोफांची सलामी देण्यात आली. शहरातील विसाव्या नंतर दुपारी राक्षसभुवन मुक्कामी पालखीचे प्रस्थान झाले.

 

कोरोना महामारीच्या निर्बंधामुळे मागील दोन वर्षापासून खंडीत झालेला पैठण येथील शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांचा पालखी सोहळा यंदा हजारोंच्या संख्येने मोठ्या उत्साहात आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करीत आहे. लाडक्या विठूरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजारो महिला,पुरूष वारकऱ्यांची पाऊले भानुदास एकनाथ, माऊली.. माऊली नामाचा गजर करीत वाट चालत आहेत. शुक्रवारी (दि.२४) मुंगूसवाडे ता. पाथर्डी मुक्कमी असलेला पालखी सोहळ्याने शनिवारी (दि.२५) शिरूर कासारकडे प्रस्थान केले.

परंपरेनुसार शहरवासीयांनी शिरूर- दहिवंडी गावच्या शिवभेटीने पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत केले. शहरात पालखीचे आगमन होताच सिंदफणा नदी पात्रात बाजारतळावर तोफांच्या सलामीने स्वागत करण्यात आले. दरम्यान, पैठणच्या शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शनिवारी शहरात आगमन होणार असल्याची वार्ता शुक्रवारीच परिसरात पोहचली. मागील दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे पालखी सोहळ्यावर निर्बंध आले होते. त्यामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर यंदा परिसरातील भाविकांमध्ये नाथ दर्शनाची उत्सूकता होती.

 

पालखी सोहळ्याच्या आगमनानंतर शहरातील हनुमान मंदीरामध्ये शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. शहरावासीयांनी ठिकठिकाणी वारकऱ्यांना चहा फराळाची व्यवस्था केली तर आनेक नागरिकांनी वारकऱ्यांना घरी फराळाची सोय केली. माऊली… माऊली चा जयघोष करत वारकऱ्यांनी चहा, फराळाचा अस्वाद घेतला.

 

शहरवासीयांच्या स्वागताने पालखी सोहळ्यातील हजारो वारकरी भाराऊन गेले. दरवर्षी पेथ यंदा शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यात महिला, पुरूष वारकऱ्यांची संख्या अधिक आहे. यावरूनच यंदा पंढरपुरच्या आषाढी वारीच्या गर्दीचा अंदाज जानकारांनी व्यक्त केला. सकाळच्या विसावा नंतर दुपारी राक्षसभुवन मुक्कामी पालखीचे प्रस्थान झाले. हरीनामाच्या गजरात मोठ्या उत्साहाने शिरूवासीयांनी पालखी सोहळ्यास निरोप दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.