राज्यभरात शिवसैनिक आक्रमक

पुणे, नाशिक नंतर नोदेडमध्ये राडा, शिवसैनिक पोलिसात धुमश्चक्री , बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा

0

रयतसाक्षी : शिवसेना आता मोठ्या प्रमाणावर आक्रमक झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फूटीर आमदारांना कालच निर्भीड इशारा दिला होता. त्यानंतर विविध ठिकाणी शिवसैनिकांनी आंदोलन सुरू केले आहे.

 

नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला काळे फासल्या नंतर काल पुण्यात आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची शिवसैनिकांनी तोडफोड केली तर आज नांदेडमध्ये भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आमदार बालाजी कल्याणकर यांच्या केसालाही धक्का लागू देणार नसल्याच्या वक्तव्या नंतर शिवसैनिकांनी बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालयासमोरून त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली असता पोलिस आणि शिवसैनिकामध्ये धुमश्चक्री झाली.

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेना आता राज्यभर आक्रमक झाल्याचे चित्र आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना गर्भीत इशारा दिला होता. यावर आमदार तानाजी सावंत याच्या वक्तव्या नंतर पुण्यात शिवसैनिकांनी त्याच्या कार्यालयाची तोडफोड केली.

नाशिकमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पोस्टरला शिवसैनिकांनी काळे फासले. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या शक्तीप्रदर्शना नंतर ठाण्यात शिवसैनिकांनी त्याच्या कार्यलयावर हल्ला चढवत तोडफोड केल्याचे समोर आले आहे. भजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या केसालाही धक्का लागू देणार नसल्याचा विश्वास दिला.

खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वक्तव्या नंतर शिवसैनिकांनी बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालयापासून त्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या वेळी शिवसैनिकांनी बालाजी कल्याणकर यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत प्रशानाचे लक्ष वेधले. आंदोलना दरम्यान कायदासुव्यवस्था अबाधीत राहण्यासाठी बंदोबस्तावरील पोलिसांनी आंदोलकांना आडविण्याचा प्रयत्न केला असता शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.