मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक

ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याच लक्ष

0

मुंबई, रयतसाक्षी: दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने जगाची चिंता वाढवली आहे. राज्यात देखील नव्या विषाणूचे दहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यापार्श्वभुमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात येते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कर्नाटक पाठोपाठ गुजरात नंतर महाराष्ट्रात ओमायक्रॉन या नव्या विषाणूचे दहा रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्याची चिंता देखील वाढली असून, आरोग्य विभाग देखील सतर्क झाला आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाला. तर, पिपंरी चिंचवडमध्ये सहा आणि पुण्यात आणि मुंबईत दोन असे महाराष्ट्रात एकूण १० रुग्ण आढळले आहेत.

तर, राजस्थानमध्ये नऊ जणांना कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. राजधानी नवी दिल्लीतही एक रुग्ण आढळून आला आहे. गोव्यातही ओमायक्रॉनने शिरकाव केला असून, तेथे देखील रुग्ण सापडल्याची माहिती मिळत आहे. तर, एसटी कर्मचाऱ्यांचा संपदेखील अद्यापही सुरुच आहे. या सर्व पार्श्वभुमीवर आज बैठकीत काय होते. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.