लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या विचारात सामाजिक न्याय व समतेचे मूळ – धनंजय मुंडे

सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यभरातील सामाजिक न्याय भवन येथे विविध कार्यक्रम; ठिकठिकाणी होणार समता रॅलीचे आयोजन,राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त धनंजय मुंडे यांनी अभिवादन करून सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या

0

रयतसाक्षी : राज्यभरात लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती  व सामाजिक न्याय दिन रविवार दि. 26 जून रोजी  साजरा करण्यात येत  आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून यानिमित्ताने विविध सामाजिक कार्यक्रम, अभिवादन सभा तसेच समता रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे.

 

“राजर्षी शाहू महाराजांनी आधुनिक समाजात समता व सामाजिक न्यायाचे मूळ रुजवले, त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतूनच राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक व आर्थिक दुर्बल घटकांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबवून आर्थिक व सामाजिक उन्नतीचे कार्य केले जाते. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वंदन करून सर्व जनतेस सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा देतो;” असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

 

राजर्षी शाहू महाराजांची जयंती व सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून राज्यातील विविध जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवन येथे समता रॅली, विविध विषयांवरील व्याख्याने, अभिवादन कार्यक्रम आदी उपक्रम स्थानिक अधिकारी, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आयोजित केले जाणार असल्याची माहिती विभागाने दिली आहे.

राज्य सामाजिक न्याय विभागाची प्रतिष्ठा वाढवणे हे आमचे कर्तव्य

धनंजय मुंडे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.