सर्पराज्ञीतून क्षितिजाची गगन भरारी

६० दिवसाच्या उपचारा नंतर निसर्गार्पण, मुंबईतून करण्यात आले सर्पराज्ञीत दाखल

0

शिरूर कासार,रयतसाक्षी: दोन महिण्यापूर्वी मुंबईहून सर्पराज्ञीत उपचारासाठी दाखल करण्यात आलेली  घारीस  (क्षितिजास) उपचारानंतर शनिवारी दि. २५ निसर्गार्पण करण्यात आले. दरम्यान साठ दिवसाच्या प्रदिर्घ् उपचाराने पूर्ण बरे झाल्यानंतर एकादशीच्या पर्वणीमध्ये सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे, मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या साधना समर्थ यांच्या हस्ते निसर्गात मुक्त करण्यात आले.

सर्पराज्ञीचे  मार्गदर्शक आदरणीय क्षितिज हिर्लेकर यांना घायाळ अवस्थेमध्ये  मुंबई येथे ही घार आढळून आली  होती. त्यानंतर त्यांनी जखमी अवस्थेतील घारीस सर्पराज्ञी  वन्यजीव पुनर्वसन केंद्र बीड येथे उपचारासाठी दाखल केले होते. सर्पराज्ञीतील  दोन महिन्याचा उपचार व सेवा शुश्रुषे  नंतर पूर्णपणे बरे झालेल्या या घारीस (क्षितिजास) शनिवारी दि. २५ एकादशीचे औचित्य साधून मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या साधना समर्थ व सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांच्या हस्ते निसर्गात मुक्त करण्यात आले.

 

 

” सर्पराज्ञीच्या माध्यमातून आजवर हजारो वन्यजीवांना नवजीवन  मिळालेले आहे.व मिळत आहे व मिळत राहील. वन्यजीवांच्या सेवा शुश्रुषेतुन जो आनंद आणि समाधान मिळते ते शब्दांत व्यक्त न होणारे आहे “.

– सृष्टी सोनवणे

(संचालिका :सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.