शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातच बंडाळी !

इतर पक्षात जाण्यास बंडखोर अमदाराचा नकार, २५ आमदार ‘मातोश्री’ च्या संपर्कात

0

रयतसाक्षी : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे याच्या बंडा नंतर महाविकास अघाडी सरकामध्ये राजकिय पेच निर्माण झाला. एकनाथ शिंदे यांनी शिवसनेच्या ४० आमदारां सोबत आसाममधील गुवाहाटीमध्ये पंचतारांकीत हॉटेलमध्ये तळ ठोकला आहे. वेगळ गट स्थापन करून थेट शिवसेनेवरच दावा करणाऱ्या शिंदे गटातील १६ आमदारांना कारवाईच्या नोटीस बजावण्यात आल्या.

 

बंडखोर गटास वेगळा गट स्थापन करता येणार नाही, इतर पक्षासोबत सत्ता स्थापन करावयाची झाल्यास बंडखोर गटास इतर पक्षात विलीन व्हावे लागणार. मग मात्र, शिवसेनेच्या बाणावर स्वार होऊन विधानसभेत पोहचलेल्या बंडखोर आमदारांना मध्यावधी निवडणूकांना सामोरं जाव लागणार. या कायदेशीर बाबींच्या बंडखोर गटातच आता बंडाळी झाल्याचे चित्र असन जवळपास २५ आमदारांनी माताश्री शी संपर्क साधल्याचा दावा शिवसेनकडून करण्यात आला आहे .

 

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकिय उलथा, पालथ निश्चित मानली जात आहे. वेगळा गट स्थापन करून थेट शिवसेनेवरच दावा करणाऱ्या बंडखोर शिंदे गटाला कायदेशीर बाबींचा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वर्षा हे सरकारी निवास्थान सोडल्या नंतर घडामोडींना वेग आला. खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना अल्टीमेटम देत मुंबईत येण्याचे अवाहन केले होते. शिवसेना पक्षाच्या कायदेशीर बाबींची चाचपणी घेत उध्दव ठाकरे यांनी काल केंद्रीय कार्यकारिणीचा मेळावा घेऊन बंडखोर शिंदे गटाला कायदेशीर बाबींचा धक्का दिला.

 

महाविकास आघाडी सरकार वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ही उध्दव ठाकरे यांच्या मदतीला धाऊन आल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांचा जीव काही प्रमाणात भांड्यात पडला. बंडखोर शिंदे गटातील १६ आमदारांना नोटीस बजावून आमदारां सोबत परराज्यात गेलेल्या गार्डवर कार्यवाहीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांच्या कुटूंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकार असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले.

 

दरम्यान, वेगळा गट स्थपन करत बंडखोर शिंदे गटाने थेट शिवसेनेवरच दावा करत इतर पक्षासोबत सरकार स्थपानेचा डाव आखला. पण विधीमंडळ आणि पक्ष यातील कायदेशीर बदल असल्याचे वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्टीट करून खळबळ राजकीय विश्लेक,तज्ञांचे लक्ष वेधले. परिष्ठ दहा चा संदर्भ देत बंडखोर शिंदे गटास वेगळा गट स्थापन करता येणार नाही इतर पक्षासोबत सरकार स्थापन करावयाचे असल्यास बंडखोर गटास इतर पक्षास समाविष्ठ व्हावे लागेल असे शिवसेना नेत्या निलम गोरे यांनी स्पष्ट केले होते.

 

बंडखोर शिंदे गट आणि शिवसेना असे चित्र निर्माण झाल्याने राज्यात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. मुंबई, नाशिक, पुणे, नांदेड मध्ये शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या कार्यलयांची तोडफोड केली. कायदेशीर बाबीमुळे बंडखोर शिंदे गटा समोर कायदेशीर बाबीचा पेच निर्माण झाल्याने गुवाहटीतील २५ बंडखोर आमदार मातोश्री च्या संपर्कात असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. सुत्रांच्या माहितीनुसार मुंबईच्या विमानतळावर हायअलर्ट जारी करण्यात आल्याने गुवाहटीतील बंडखोर आमदार सायंकाळपर्यंत महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

राज्यपाल ऍक्शन मोड मध्ये : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नुकतीच कोरोनावर मात करून रविवारी रूजू झाले आहेत. बंडखोर आमदारांच्या कुटूंबीयांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्याचे पत्र राज्यपाल भगतीसिंग कोश्यारी यांनी दिल आहे. त्याच बरोबर बंडखोर आमदारांना सुरक्षा पुरविण्यासाठी मुंबईच्या पोलिस महासंचालकांना पत्र दिले आहे.

 

अदित्य ठाकरेंचे गौप्यस्फोट : बंडखोर गटातील १५ ते १६ आमदार आमच्या संपर्कात आहेत पण गद्दारांना संधी नाही, दि. २० मे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेबांनी यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचंय का? असे विचारले होते. मुख्यमंत्री पदाच्या ऑफर नंतरही शिंदेनी बंड केलं. शिवसेना आणि चिन्ह आपलच राहणार इतर पक्षात विलीन होऊन हिंमत असेल तर निवडणूकीला सामोरं जा परत विधान भवानाची पायरी चढू देणार नाही असा सज्जड दमच अदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.