ऑनलाईन चक्रीमटक्याची तरूणाईला लत

स्थानिक पोलिसांच्या मुक संमतीने उसतोड मजुर, युवकांची लूट

0

शिरूर कासार, दि.२७ रयतसाक्षी:  उसतोड मजुर गावी परतल्याने अवैध धंदेवाल्यांच्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. त्यातच आता उसतोड मजुरांच्या उचली सुरू झाल्याने मजुर, युवकांना लूटनाऱ्या अवैध धंदेवाल्यांच्या टोळ्या सक्रीय होतात. त्याचेच प्रत्यक्षदर्शी उदाहरण शहरात नविनच ऑनलाईन चक्री मटक्याच्या माध्यमातून राजरोस मजुर, युवकांना लूटीचा गोरख धंदा सुरू आहे. ऑनलाईन प्रक्रियेमुळे युवकांना ऑनलाईन चक्रीमटक्याचा चांगलाच मोह जडला असून अनेक युवकांना याची लत लागली असली शिरूर पोलिस मात्र या प्रकाराकडे जानिपूर्वक दूर्लक्ष करीत आहेत.

 

शिरूर कासार तालुका हा उसतोड मजुरांचा तालुका म्हणून परिचत आहे. उसतोड मजुर गावी स्थिरावताच उद्योग, व्यवसायास सुगीचे दिवस येतात आणि आर्थीक चक्राला गती मिळते. उसतोड मजुरांमुळे तालुक्यातील सर्व व्यवसायांना बरकत मिळत असली तरी उसतोड मजुरांकडील उचल रकमांवर डल्ला मारणाऱ्या अवैध धंदेवाल्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. खरिप हंगाम सुरू झाल्याने शेतकरी कृषी निविष्ठांच्या खरेदी विक्रीसाठी शहरात युवक, शेतकऱ्यांची गर्दी वाढली आहे. खत- बीयानासाठी आनलेल्या पैशाने खिशात गरम असल्याने अमिषाने तरूण या चक्रीमटक्याच्या बुकीकडे आकर्षीत होत आहेत.

 

उसतोड मजुरांच्या उचली सुरू झाल्याने बहूतांश मजुर शहरातील चक्रीमटक्यावर घामाचा पैसा ओतून रिकाम्या हाताने घरी परतत असल्याने परिसरात कौटूंबीक कलहाचे प्रमाण वाढत आहेत. चक्रीमटक्यावर घामाचा पैसा ओतणाऱ्या मजुरांचे आई वडील,पत्नी, मुले यांना त्रास सहन करावा लागत असला तरी कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी उपाय योजनांचा मागमूस नसलेल्या शिरूर पोलिसांना मात्र याचे कसलेही सोयर-सुतक नाही. या उलट पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कक्षेच्या बाहेर असलेल्या खोल्यांमध्ये दिवसभर अवैध धंदेवाल्याचा राबता शहरासह तालुकावाशीय उघड्या डोळ्यांनी पाहून सहन करत आहेत.

 

शहरात महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी देखील या चक्रीमटक्याच्या बुकीकडे आकर्षीत होत असल्याचा धक्कादायक प्रकार काही नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर उघड्याडोळ्याने पाहत आहेत. उसतोड मजुर, युवक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनाही या ऑनलाईन चक्री मटक्याची लत  लागल्याने युवा पिढी व्यसानाधिनतेच्या आहारी जात असून कष्ठाचा, घामाच्या पैशावर डल्ला मारणारा बुकी चालकाच्या खुशामतीत शिरूर पोलिस मग्न आहेत.

 

प्रत्यक्षात कार्यक्षेत्रात माशी शिंकल्याची माहिती मळणाऱ्या शिरूर बाजारतळावर राजरोस सुरू असलेल्या ऑनलाईन चक्रीमटक्याची भनकही नसावी हे नवलंच. शिरूर पोलिस ठाण्यातील एक वादग्रस्त अधिकाऱ्याची या धंद्यात पार्टनरशीप असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे बोकाळलेला बुकी चालक रासरोज लोकांची लूट करीत आहे.

 

बुकी भोवती हेरांचा पहारा : शहरातील बाजारतळावर सुरू असलेल्या ऑनलाईन चक्री मटका बुकीकडे ग्राहका व्यतिरीक्त पोलिस अथवा संशयीत व्यक्तींच्या हालचालींवर बारकाईने पाळत ठेवण्यासाठी बुकीकडे येणाऱ्या वेगवेगळ्या रस्त्यांवर ठिक ठिकानी शहरातील बेकार तरूणांचा पहारा लावण्यात आला आहे. बेकार तरूणांना पैशासह खान्या पिण्याचे आमिष दाखवून अवैध ऑनलाईन चक्रीमटका बुकीला पहारा लागवणारे बेकार तरूणच भविष्यात या मार्गाचा अवलंब करती यात शंका नाही.

माहिती घेऊन कारवाई करू: जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर कोठे चक्रीमटका सुरू असेल तर माहिती घेऊन कारवाई केली जाईल. असे पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकुर रयतसाक्षीशी बोलताना म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.