धक्कादायक: केजमध्ये नगरसेविकेच्या पती विरोधात अत्याच्याराचा गुन्हा

फिर्यादी महिलेविरोधात ब्लॅकमेलींगची तक्रार

0

केज, रयतसाक्षी: येथील नगरसेविकेच्या पती विरोधात तालुक्यातील एका महिलेने अत्याचाराची तक्रार दिल्याने केज पोलिसात गुन्हा झाला आहे. तर नगरसेविकेने तक्रारदार महिलेच्या विरोधात ब्लॅकमेलींगची तक्रार दाखल केली आहे. परस्पर विरोधी तक्रारीमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील एका महिलेने सुग्रीव कराड याने लग्न करण्याचे आमिष दाखवून अनेक वेळा इच्छे विरूध्द शारिरीक संबध ठेवले. या शिवाय दोन महिन्याचा गर्भपात केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर पिडीतेने लग्नाचा तगादा लावल्याने तु खालच्या जातीची आहेस म्हणून लग्नाला नकार दिला. तसेच सोमवारी (दि.२७) सुग्रीव कराड याची पत्नी, आई व इतर दोन महिलांनी घरी जाऊन पिडीतेस मारहाण केली.

 

दरम्यान, वाद सोडविण्यासाठी आलेल्या पिडीतेच्या आई, वडिलांना मारहाण केली. या शिवाय जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत तु गावात कशी राहतेस हे बघून घेतो असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीतेच्या फिर्यादीवरून  नगरसेवक पती सुग्रीव कराड, पत्नी, आई व इतर दोन महिलांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

फिर्यादी महिलेविरोधात ब्लॅकमेलींगची तक्रार

केज नगर पंचायतीच्या नगरसेविका आशा सुग्रीव कराड यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गावातील त्या महिलेने मी एकटी राहते म्हणून मदतची मागणी केली होती. त्यावरून सदरील महिलेला अनेक वेळा रोख रक्कम देऊन मदत केली. आतापर्यंत जवळपास दोन लाख ५० हजार रूपये दिले आहेत. तरीही ती १२ लाख रूपये मागत असून जर पैसे नाही दिले तर मी तुझ्या पती विरोधात बालात्काराची तक्रार देऊन बदनामी करेल अशी धमकी देत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून अत्याचाराची तक्रार दिलेल्या महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. परस्पर विरोधी गुन्ह्याचा उलगड्याचे केज पोलिसांसमोर अव्हान असून तपासाअंती खरा प्रकार समोर येणार असला तरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.