जिल्हा परिषदेची प्रभाग रचना निश्चित , गट- गणात कोणत्या गावांचा समावेश वाचा

निवडणूकीचा मार्ग मोकळा , प्रभाग रचनेत अंशत बदल

0

बीड, रयतसाक्षी:  जिल्हा परिषदेचे ६९ गट व पंचायत समितीच्या १३८ गणांची अंतिम प्रभाग रचना विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी अंतिम केल्यानंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी मंगळवारी दि.२७ अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात ६९ गट व १३८ गणांवर शिक्कामोर्तब झाले आहे . दरम्यान , जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेल्या आक्षेप अर्जावरून आष्टी, गेवराई, माजलगांव आणि केज या चार तालुक्यातील गट, गणात अंशत बदल करण्यात आला आहे.

 

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दि.२ जून रोजी जिल्ह्यातील ६९ गट व पंचायत समितीच्या १३८ गणांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द केल्यानंतर आक्षेप नोंदविण्यास मुदत दिली होती. या मुदतीत जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल १५१ गट, गणाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीवर विभागीय आयुक्त कार्यालयात दि. १७ जून रोजी सुनावणी घेण्यात आल्या.

 

या सुनावणीनंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दि. २२ जून रोजी प्रभाग रचना अंतिम केली. त्यानंतर ही अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकारी शर्मा यांनी दि.२७ जून रोजी गट व गणांची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द केली आहे. या नव्या अंतिम प्रभाग रचनेनुसार आता जिल्ह्यात ६९ गट तर १३८ गण असणार आहेत हे निश्चित झाले आहे. आक्षेप अर्जानंतर आष्टी, गेवराई, केज व माजलगांव तालुक्यातील गट व गणात बदल झाला आहे. एका गट व गणातील गावे दुसऱ्या गट वा गणात टाकण्यात आले आहेत

 

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी दि.२७ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभाग रचनेनुसार गेवराई तालुक्यातील रेवकी गटात बाग पिंपळगाव व रेवकी गण, तलवाडा गटात तलवाडा व अंतरवली गण, जातेगाव गटात जातेगाव, रोहितळ, गढी गटात गढी, सिरसदेवी, धोंडराई गटात धोंडराई, राजपिंप्री, उमापूर गटात उमापूर, गुळज, चकलांबा गटात चकलांबा, बंगाली पिंपळी, मादळमोही गटात मादळमोही, कोळगाव, पाडळशिंगी गटात पाडळशिंगी, सिरसमार्ग, रुई गटात रुई, पांचेगाव तर वडवणी यातील कवडगाव, गटा हरिश्चंद्र पिंपरी, उपळी गटात उपळी, कुप्पा, चिखलबीड गटात चिखलबीड, चिंचवण.

 

बीड तालुक्यातील राजुरी नवगण गटात राजुरी, कामखेडा, बहिरवाडी गटात बहिरवाडी, माळापुरी, नाळवंडी गात, नाळवंडी, घोड़का राजुरी, पिंपळनेर गटात पिंपळनेर, वडगाव गुंदा, ताडसोन्ना गटात ताडसोन्ना, ढेकणमोहा, पाली गटात पाली, येळंबघाट, लिंबागणेश गटात लिंबागणेश, चऱ्हाटा, नेकनुर गटात नेकनुर, मोरगाव, चौसाळा गटात चौसाळा, बोरखेड तर शिरूर तालुक्यातील मातोरी गटात मातोरी, फुलसांगवी, पाडळी गटात पाडळी, राक्षसभुवन, पिंपळनेर गटात पिंपळनेर, वारणी, रायमोहा गटात रायमोहा, खालापुरी, पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही गटात, डोंगरकिन्ही, पिट्टी, तांबाराजुरी गटात तांबाराजुरी, थेरला, अंमळनेर गटात, अंमळनेर, कुसळंब, सौताडा गटात सौताडा, पारगाव.

 

तर आष्टी तालुक्यातील दौलावडगाव गटात दौलावडगाव, सावरगाव घाट, धामणगाव गटात, धामणगाव, सुरुडी, बीड सांगवी गटात, बीडसांगवी, ब्रम्हगाव, धानोरा गटात धानोरा, डोंगरगण, लोणी गटात लोणी, रुई नालकोत, कडा गटात कडा, शिराळ, मुर्शदपूर गटात मुर्शदपूर, खडकत, आष्टा गटात आष्टी, पांढरी. तर केज तालुक्यातील विडा गटात विडा, येवता, आडस गटात आडस, जिव्हाची वाडी, होळ गटात होळ, उंबरी, नांदूरघाट गटात नांदूरघाट, शिरुरघाट, चिंचोळीमाळी गटात चिंचोळीमाळी, टाकळी, युसूफवडगाव गटात युसूफवडगाव, सोनी जवळा, बनसारोळा गटात बनसारोळा, जवळबन, धारुर तालुक्यातील तेलगाव गटात तेलगाव, मोहखेड, भोगळवाडी गटात भोगळवाडी, जहांगिरमोहा, आसरडोह गटात, आसरडोह, मोहा.

 

परळी तालुक्यातील पिंप्री बु. गटात पिंप्री बु, पोहनेर, सिरसाळा गटात सिरसाळा, पिंपळगाव गाडे, टोकवाडी गटात, टोकवाडी, पांगरी, नागापूर गटात, नागापूर, मोहा, जिरेवाडी गटात जिरेवाडी, दोनापूर, दाऊतपूर गटात दाऊतपूर, नंदागौळ, धर्मापुरी गटात धर्मापूरी मांडवा तर माजलगाव तालुक्यात सादोळा, मोगरा, किट्टी आडगाव, टाकरवण, तालखेड, पात्रुड, दिंद्रुड हे गट, अंबाजोगाई तालुक्यातील मोरेवाडी गटात मोरेवाडी येल्डा, घाटनांदूर गटात, घाटनांदूर, जवळगाव, पट्टीवडगाव गटात पट्टीवडगाव, उजनी, बर्दापूर गटात बर्दापूर, लिंबगाव, जोगाईवाडी गटात जोगाईवाडी सायगाव, चनई गटात चनई, लोखंडी सावरगाव,पाटोदा गटात पाटोदा, राडी हे अंतिम गट व गण असणार आहेत.

 

रेवकी, टाकरवण, चिंचोलीमाळीसह लोणी गटात बदल

जिल्हापरिषद गट व पंचायत समिती गण रचना नुकतीच जाहीर करण्यात आली होती. या रचनेवर कोणाचा आक्षेप असेल तर तो सादर करण्यासंदर्भात निवडणूक विभागाकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाभरातून ११७ आक्षेप दाखल करण्यात आले होते.

 

याची सुनावणी आयुक्तांसमोर झाली. त्यावर निर्णय घेवून काही गट, गणात बदल करण्यात आले आहेत. यामध्ये गेवराई तालुक्यातील रेवकी गटातील गैबीनगर तांडा धोंडराई गटात समाविष्ट करण्यात आला आहे. माजलगाव तालुक्यातील टाकरवण गटांतर्गत वाघोरा गणात असलेले सुड़ीं नजीक हे टाकरवण गणात समाविष्ट करण्यात आले तर टाकरवण मधील बाराभाई तांडा वाघोरा गणात समाविष्ट करण्यात आला आहे.

 

केज तालुक्यातील चिंचोली माळी गटातील बोबडेवाडी हे गाव युसूफ वडगाव गटात समाविष्ट करण्यात आले आहे. आष्टी तालुक्यातील लोणी स. गटातील सोलापूरवाडी रुई नालकोल गटामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. तर रुई नालकोलमधील खरडगव्हाण लोणी स. मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. याबरोबरच कडा गटातील पिंप्री घुमरीचा रुई नालकोल गटामध्ये समावेश करण्यात आला आहे.

 

टाकळी आमीया कडा गटात बदल

आष्टी तालुक्यातील टाकळी अमीया हे पंचायत समिती गणाचे गावच कडा गटात समाविष्ट झाल्याने आता त्याऐवजी रुई नालकोल हा पंचायत समिती गण करण्यात आला आहे.

 

ढेकणमोहा तांडा ग्रामपंचायतीचा कोणत्याच गटात समावेश नाही

सोमवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या बीड तालुक्यातील अंतिम जिल्हा परिषद गट / पंचायत समिती गण रचनेत निवडणुक आयोगाच्या निकषानुसार ताडपोन्ना गटात सामाविष्ट होऊ शकणाऱ्या ढेकणमोहा तांडा हे गाव स्वतंत्र ग्रामपंचायत असून सदरील ग्रामपंचायत ही प्रशासनाच्या गलथान काराभारामुळे जिल्ह्यातील कोणत्याही जिल्हा परिषद गटात समाविष्ट करण्यात आलेले नाही. ही अतिशय गंभीर बाब असून, या प्रकरणात प्रशासन व असुरी राजकीय शक्तींचा हस्तक्षेप उघडरीत्या दिसत आहे.

 

आता आराक्षणाकडे लक्ष

विभागीय आयुक्‍तांच्या निर्णयानंतर जिल्‍हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध‍ केली आहे. प्रभाग रचना अंतिम झाली असल्याने आता या ६९ जिल्‍हा परिषद मतदारसंघातील आरक्षण जाहीर होतील. त्यामुळे रचना अंतिम झाल्याने आता मतदारसंघाच्या आरक्षण सोडतीकडे इच्‍छुकांचे लक्ष लागले आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.