‘राष्ट्रीय-डॉक्टर्स डे’ डॉक्टर हे सदैव सन्मानीयच…!

आरोग्याचे मोल म्हणजे डॉक्टरांचे मोल..!

0

 

रयतसाक्षी : डॉक्टर आणि देव या एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत असे समजण्याचा एक काळ होता. मात्र आता व्यवसायिक जगात डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातही व्यवहारिक नाते निर्माण होऊ लागले आहे. फॅमिली डॉक्टर ही संकल्पनाही संपुष्टात येऊ लागली आहे. यात समाजव्यवस्थाच दोषी दिसत आहे. वैद्यकीय व्यवसाय केवळ डॉक्टरांच्या हातात न राहता औषध उत्पादक कंपन्या, विविध तपासण्या करणार्‍या लॅब आणि विमा कंपन्यांच्या हातात गेल्याने वैद्यकीय व्यवसाय एका दुष्टचक्रात अडकू पाहात आहे.

 

एका बाजूला ग्राहक संरक्षण कायदा आणि दुसर्‍या बाजूला रुग्णहित. या संवेदनशील कात्रीत डॉक्टर अडकले आहेत. याचा बर्‍याचवेळा विचार होत नाही. रुग्णांना कमीत कमी आर्थिक मोबदल्यात उत्तम सुविधा पुरविण्याच्या धावपळीत डॉक्टरांची दमछाक होते आणि त्यांचा ताण वाढतो. ही बाबही ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने समाजासोबतच सर्वांनी लक्षात घ्यायला हवी.

 

साधारणपणे १९९५  सालापासून डॉक्टर व रुग्ण यांच्या नात्यात ग्राहक संरक्षण कायद्याने रितसर प्रवेश केला व रुग्ण हा डॉक्टरांचा झाला तर डॉक्टर हा वैद्यकीय सेवा देणारा विक्रेता बनला. त्यामुळे साहजिकच रुग्णांच्या कुटुंबातील एक घटक बनलेला देण्या-घेण्यापलीकडचा असलेला फॅमिली डॉक्टर व्यावसायिक बनला. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवादच हरवला आहे. सुपर स्पेशलायझेशन, कट प्रॅक्टिस यासारख्या गोष्टींमुळे डॉक्टर-रुग्ण यांच्यात दुरावा वाढतच चालला आहे. अशाही परिस्थितीत आपल्या सहृदयतेने पेशंटस्ना आपलेसे करणारे डॉक्टर आपल्या आसपास आहेत, पण त्यासाठी तथाकथित मोठ्या शहरातील ‘बडय़ा’ (महागडय़ा) हॉस्पिटलची क्रेझ आपणच विसरायला हवी… हे ही तितकेचं महत्वाच आहे..?

 

आजच्या ‘डॉक्टर्स डे’च्या निमित्ताने रुग्ण व डॉक्टरांचे परस्पर संबंध अधिकाधिक निकोप होऊन घट्ट व्हावेत आणि हे आमचे डॉक्टर व हा माझा पेशंट ही सुहृद्य भावना अधिक रुजावी-फुलावी यासाठी डॉक्टर, रुग्ण, नातेवाईकांनी प्रयत्न करायला हवेत…

यासाठी अविरत कार्यरत डॉक्टर्स व सर्वांनाच “डॉक्टर्स डे” च्या मनापासून शुभेच्छा तसेच पुढील वाटचालीसाठी भरभरून सदिच्छा…!

 

 नवनाथ लक्ष्मणराव येवले

 संपादक दैनिक रयतसाक्षी

सौ. मिरा नवराथ येवले

कार्यकारी संपादक दैनिक रयतसाक्षी

९४०४६५२७११, ९२०९२६४९९१

 

प्रमोद लखू निकम

उपसंपादक दैनिक रयतसाक्षी

९६७३३२२२०१

राम गडदे, महादेव सवासे

…..रयतसाक्षी परिवार

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.