भाजपमध्ये ब्राम्हण नेत़ृत्वाचे खच्चीकरण !

पंतप्रधानपदाचे दावेदार गडकरी अन मुख्यमंत्रीपदाचे दावेदार फडणवीस यांना डावलंजातय, ब्राम्हण महासंघाचा गंभीर आरोप

0

रयतासाक्षी : भाजपचे नितीन गडकरी व देवेंद्र पडणवीस यांनी आपला राजकीय मुत्सद्दीपणा वेळोवेळी सिध्द केला असताना पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून हटवण्यासाठी नती गडकरींचे चारित्र्यहनन करून खच्चीकरण् करण्यात  आले तर गेल्या तीन वर्षापासून भजपमधील तथाकथित नेते मंडळी देवेंद्र फडणवीस यांची घैडदौड थांबविण्यासाठी पूर्ण् बहूमतापेक्षा अधिक आमदार निवडून आल्यानंतरही सरकार न बनू देण्याचे षडयंत्र रचून देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे भाजपमध्ये ब्रम्हणांचे खच्चीकरण् होत असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी आज शुक्रवारी पुणे येथे केला.

 

उपमुख्यमंत्री पदावर केली बोळवण

डॉ. गोविंद कुलकर्णी म्हणाले की,फडणवीस यांनी आपल्या राजकीय कौश्यल्यातून पुन्हा भजपला सत्तेच्या दारापर्यंत पोहचवले. मात्र, यान्रतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे निर्देश पक्षश्रेष्ठींनी दिले. फडणवीस यांनी मोठ्या मनाने मुख्यमंत्री पदाचा त्याग करून कार्यकर्ता म्हणून काम करण्याचे ठरविल्यानंतर भाजपमधील वरिष्ठ नेतृत्वाने बळजबरीने उपमुख्यमंत्री पद देऊन त्यांची बोळवण केली आहे. त्यामुळे पक्षातूनच मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्यात आले.

 

मुख्यमंत्रीपद जात पाहून द्यायचे का गुण?

आनंद दवे म्हणाले की, भजपमध्ये एकानंतर एक ब्राम्हण नेतृत्वाचे खच्चीकरण् करण्याचे एक सुनियोजित कारस्थान चालल्याचे निदर्शनास येत आहे. या घटनेचा अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ तीव्र शब्दात निषेध करीत आहे. मुख्यमंत्री पद गुण पाहून द्याचे का जात पाहून ठरवले पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांचा भजपने उपमुख्यमंत्री पद देऊन अपमानच केला आहे. पुन्हा एकदा केवळ ब्राम्हण मुख्यमंत्री म्हणून जर त्यांना संधी नाकरली असेल, तर भाजप सुध्दा जातीय राजकारणच करतो हे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे.

 

देवेंद्र फडणवीसांचा अपमान करून हे सरकार व्हेंटिलेटरवर..!

मी सरकारमध्ये नसणार आहे, असे जाहीरपणे सांगूनही फडणवीस यांना कालच शपथ घेण्याची सक्ती करून, तसे ट्टिट करून, जाहीर आदेश देऊन भाजपने देवेंद्र फडणवीस यांचा अपमानच केला आहे. हे सरकार दिल्लीच्या व्हेंटिलेटरवरच आगामी काळात राहील हे पहिल्या दिवशीच राज्याला दाखवून दिले आहे, असा नाराजीचा सूर महासंघाच्या पादधिकाऱ्यांनी बोलून दाखविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.