सरपंच निवड जनतेतूनच करा – सरपंच परिषद

शिरूर कासार तालुका सरपंच परिषदेचे तहसीलदार यांना निवेदन

0

रयतसाक्षी : ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच निवडीसाठी होणाऱ्या घोडेबाजारास आळा घालण्यासाठी सरपंच निवड जनतेतूनच करण्याची मागणी शिरूर कासार तालुका सरपंच परिषदेच्या वतिने तहसीलदार श्रीराम बेंडे यांना निवेदनाद्वारे वतिने करण्यात आली आहे.

 

भाजप युती शासनाच्या कालावधीत सन २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात जनतेतून सरपंच निवड विधेयकाची आंमलबजावणी करण्यात आली होती. त्यानुसार राज्यातील निम्याहून अधिक ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडी जनतेतून झाल्या. या पारदर्शक प्रणालीमुळे गावपातळीवरील सरपंच निवडीच्या घोडे बाजारास आळा बसला होता.

 

जनतेतून सरंपच निवडण्यात आलेल्या सरपंचांनी झोकून देत विकास कामे राबविली. शाश्वत विकास कामाने गावपणाचा आरसा उजळून निघाल्याने जनतेच्या विश्वासास पात्र ठरलेल्या सरपंचांना निश्चित जनता पुन्हा संधी देईल यात शंका नाही, पण सरपंच निवड जनतेतूनच व्हायला हवी. जनतेतून सरपंच निवडीमुळे गावपातळीवर विकास कामांना बाळसं आलेलं असताना २०१९ मध्ये सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडी सरकारने जनतेतून सरपंच निवड प्रक्रिया रद्द केली.

 

त्यामुळे पुन्हा ग्रामपंचायत सभाग्रहामध्ये सरपंच निवडीसाठी सदस्यांची पळवापळवीला उधान आले आणि घोडेबाजारास सुरवात झाली. महाविकास आघाडी सरकारने ऐन दिवाळी सनाच्या काळात गावातील विद्यूत खांबावरील पथदिवे बीला अभावी काढून टाकण्याचे फर्मान जारी केले. या शिवाय देयका अभावी  गावच्या पाणीपुरठ्यासाठी विद्यूत मोटारीचे विज कनेक्शन कपातीचे धोरण राबविले त्यामुळे गावखेड्यांच्या सुरळीत पाणीपुरवठ्यास अडथळा निर्माण झाला. जनतेतून सरपंच निवडीसाठी सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष दत्ता काकडे यांनी जनतेच्या मनातील भावनांना वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडे जनतेतून सरपंच निवडीची मागणी केली.

 

ग्रामीण भागाकाच्या कायापालट साठी जनतेतून सरपंच निवड कशी हिताची आहे हे सरकार दरबारी मांडले परंतू महाविकास आघाडी सरकारने या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे साफ दूर्लक्ष केले. राज्यातील तमाम जनतेच्या भावना लक्षात घेवून नव्यानेच सत्तारूढ झालेल्या भाजप सरकारने पुन्हा सरंपच निवड जनतेतूनच करण्याची मागणी शिरूर तालुका  सरपंच परिषद तालुकाध्यक्ष माऊली नागरगोजे उपाध्यक्ष सुदाम काकडे,  महिला अध्यकक्षा शिला आघाव, सरपंच वैजिनाथ खेडकर , विजय सानप, हनुमंत डोंगर, देवीदास नेटके ,दत्तात्रय तांबे, भागवत दादा सानप आदी तालुक्यातील सरपंच यांनी तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रि फडणवीस, राज्यपाल भगतशिंग कोशारी, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष दत्ता काकडे यांना पाठवल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.