नांदेडच्या गोल्डमॅन मनसैनिकास सोनसाखळी मिळाली परत

२०० ग्रॅमची सोनसाखळी औरंगाबाद सिटी पोलसचौकी पोलिसांना यश, बीडचे दोन आरोपी ताब्यात

0

रयतसाक्षी : महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दि. १ मे रोजी औरंगाबाद येथील सभास्थळी राज ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर गर्दीचा फायदा घेऊन नांदेड मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंघ जहागिरदार यांच्या गळ्यातील २०० ग्रॅम सोन्याची सोनसाखळी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. या प्रकरणी पोलिसांची बीड शहरातील पेठ बीड भागातून दोन संशयतींना ताब्यात घेत त्यांच्याकडून दहा लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तकगत करण्यात सीटी चौकी पोलसांना यश आल्याची माहिती वरिष्ठ निरिक्षक अशोक गिरी यांनी दिली.

 

दत्ता श्रीमंत जाधव आणि उमेश सत्यभान टल्ले दोघे ही (रा. गांधीनगर, झोपडपट्टी, पेठ बीड ता. जि. बीड) अशी गजाआड केलेल्या आरोपींची नावे आहेत. उमेश यास बीड येथून तर दत्ता यास पुण्यातून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

औरंगाबाद येथे दि.१ मे रोजी आयोजित राज ठाकरे यांच्या जाहिर सभेसाठी मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यातूनही मनसैनिक मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. राज ठाकरेंच्या या सभेत विक्रमी गर्दी झाली होती. यामध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष मॉन्टीसिंग जहागिरदार हे वाहनाने सभेसाठी हजर झाले होते.

 

नांदेड जिल्ह्यातील गोल्डमॅन म्हणून मॉन्टीसिंघ जाहागिरदार यांची ओळख आहे. दरम्यान मॉन्टीसिंघ जहागिरदार हे आपल्या अंगावर ५० तोळे सोने नेहमी परिधान करतात. रात्री ८: ०० सुमारास राज ठाकरे यांचे आगमन झाले. त्यावेळी प्रवेशद्वारावर गर्दी होती. गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांची दहा लाख रूपये किमतीची २०० ग्रॅम वजनाची सोनसाखळी लंपास केली.

 

या प्रकरणी सिटी पोलिसात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली असता सबंधीत चोरटे हे बीड येथील असल्याचे समोर आले.

 

पोलिस निरक्षक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक भंडारे, उपनिरिक्षक कल्याण चाबूकस्वार, जमादार विलास काळे, देशराज मोरे, अभिजीत गायकवाड यांच्या पथकाने बीड येथे शोध घेतला असता उमेश यास बीड येथून ताब्यात घेतले. चौकशी नंतर दत्ता यास पुण्यात अटक केली. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच गुन्ह्याची कबुली देत त्यांनी सोनसाखळी काढून दिली. चोरटे दत्ता जाधव व उमेश टल्ले हे दोघे सराईत गुन्हेगार असून पोलिस रेकॉर्डवर आहेत. त्यांच्यावर विविध प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत सिटी चौक पोलिसांनी अनेकवेळा हूलकावनी दिली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.