छेड काढणाऱ्या रोडरोमिओंना भर रस्त्यात मुलींनीच दिला चोप

गेवराई शहरातील घटना तत्काळ माहिती देवून पोलिस अर्धातास उशीरा पोहोचले,

0

गेवराई, रयतसाक्षी: महाविद्यालयात ये- जा करताना रस्त्यावर मोटारसायकलवरून पाठलाग करत शिट्ट्या मारून डायलॉग, शेरेबाजी करणार्‍या दोन रोडरोमिओंना वैतागलेल्या तरुणींनी सोमवारी (दि.४) भर रस्त्यात आडवून चोप दिला.  दरम्यान, मोटारसायकल सह दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिले शहरातील ताकडगाव रोडवरील न्यू हायस्कूल शाळेसमोरील घटनेची गेवराई पोलिसांना तत्काळ माहिती देवूनही पोलिस तब्बल अर्धातास उशीरा पोहचल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

 

बाहेर गावातून गेवराई शहरात महाविद्यालयिन शिक्षणासाठी आलेल्या तीन तरुणी शासकीय आयटीआय कॉलेजमध्ये जात असताना काही रोडरोमिओ दररोज पाठलाग करत होते. रस्त्यावर मोटारसायकलवरून पाठलाग करणारे रोडरोमिओ या तरूणींना कट मारत, शिट्या मारून शेरेबाजी करत होते.  सोमवारी (दि.४) या महाविद्यालयिन तरूणींच्या सहशिलतेचा बांध फूटला रोजच्या छेडछाडीला कंटाळून शहरातील ताकडगाव रोडवरील न्यू हायस्कूल शाळेच्या गेटसमोर थेट त्या रोडरोमिओंना आडवून त्यांच्या गाडीची चावी हिसकावून घेतली.

 

त्यानंतर तरूणींनी चौकशी करत त्यांना भर रस्त्यात सिनेस्टाईलने चोप दिला. यावेळी जमलेल्या गर्दीतल्या नगारिकांना तात्काळ पोलिसांना बोलावून घेण्याची विनंती केली. दरम्यान नागरिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. प्रत्यक्ष पोलिसांना घटनेची माहिती देवूनही तब्बल आर्ध्या तासानंतर गेवाराई पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळावर पोहचले. पोलिसांना घटनास्थळी पोहचू पर्यंत तरूणींना रोडरोमिओंना घटनास्थळावर पकडून ठेवावे लागले. उशीरा घटनास्थळावर पोहचलेल्या पोलिसांनी एक मोटारसायकलसह दोघांना ताब्यात घेवून ठाण्यात नेले.

 

पोलिसांनी दोघांची चौकशी करून समज देत प्रतिबंधक कारवाई करून त्यांना सोडून दिल्याचे सांगण्यात आले. पण शहरातील या वाढत्या छेडछाडीच्या घटनांमुळे पोलिस प्रशासनाबाबत पालकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

 

गेवराई शहरात छेडछाडीच्या प्रकारात वाढ, चिडीमार पथक नावालाच : शहरात आशा अनेक घटना समोर येत असताना मात्र पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्षामुळे कायद्याचा धाक नसल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी घाडलेल्या घटनेबाबत या तरुणींनी अनेकांना पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन केल्यानंतर घटनास्थळावरून अनेकांनी पोलिस ठाण्याला व अधिकार्‍यांना याबाबत माहिती दिली. मात्र यानंतर तब्बल अर्ध्या तासानंतर एक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत या मुलींना या टवाळखोरांना पकडून ठेवत भर रस्त्यात ताटकळत उभा रहावे लागले याचे गेवराई पोलिसांना कुठलेच गांभीर्य नसल्याचे दिसून आले.

 

चोरीच्या घटनांसह गुन्हेगारीत वाढ: गेल्या अनेक दिवसांपासून गेवराई शहरात चोरीच्या घटनांसह मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत असताना गेवराई पोलीस मात्र दलालांचे हस्तक झाल्याचे दिसून येत आहे. गेवराई शहरासह अनेक भागात चोरी- मारामारी आशा अनेक घटना घडत असताना याकडे मात्र साफ दुर्लक्ष होताना दिसून येत आसून याबाबत वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणीनागरिकातून होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.