जिल्हा परिषद आरक्षण कार्यक्रम जाहिर

राज्य निवडणूक आयोगाच्या सुचना

0

रयतसाक्षी : राज्यात स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दिशेने आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. आता राज्यातील जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या गट आणि गणांसाठी आरक्षण् सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. त्यानुसार आता सोडत काढून ऑगस्टच्या दोन तारखेला आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण् केली जाणार आहे.

 

राज्य निवडणूक आयोगाने जिल्हापरिष्द आणि पंचायत समित्यांच्या गट- गणांसाठी आरक्षण सोडत जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर केली जाणार आहे. आरक्षणाची सोडत १३ जूलै रोजी काढण्यात येणार असून त्यानंतर त्यावर आक्षेप घेण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. आक्षेपावर निर्णय घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी आपला अहवाल २५ जूलै पर्यंत राज्य निवडणूक आयोगास सादर करावयाचा आहे.

 

दरम्यान, आयोग त्यानंतर २९ जूलै रोजी आरक्षण् सोडतीला मंजुरी देणार असून २ ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण् प्रसिध्द होणार आहे. सध्या राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण् संपुष्टात आल्याने यावेळी केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जाती- जमाती व सर्वसाधारण् महिला असेच आरक्षण् काढले जाणार आहे. बीड जिल्हा परिषदेच्या ६९ गटांसह जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांच्या १३८ गणांमधून हे आरक्षण काढण्यात येणर असून एकून संख्येच्या ५० टक्के महिला सदस्य असणार आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.