गुटखा माफियांची अनोखी शक्कल

डाक कंटेनरमधून तस्करी ; परळीच्या संभाजीनगर पोलिसांची भल्या पहाटे धाडसी कारवाई

0

परळी, रयतसाक्षी: जिल्ह्याचे सहायक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी गेल्या वर्षभरात गुटखा माफियांविरोधात असंख्य कारवाया केल्या . त्यानंतरही बीड जिल्ह्यात गुटखा माफिया वेगवेगळ्या शक्कल लढवत गुटख्याची तस्करीचा प्रकार घडला आहे. दरम्यान, गुटखा माफियांनी डाक पार्सलच्या नावाखाली कंटेनरमधून गुटखा तस्करी करण्यास सुरुवात केल्याचे बुधवारी (दि.६) समोर आले आहे. परळीच्या संभाजीनगर पोलिसांनी ईटके कॉर्नर परिसरात पहाटे ३: ५० वाजता डाक पार्सलचे कंटेनर अडवले असता त्यामधून सुमारे साडे दहा लाख रुपयांचा गुटखा मिळून आल्याने खळबळ उडाली आहे.

 

गुटखा माफियांनी आता जिल्ह्यात वेगळ्या पद्धतीने गुटखा आयात करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येते आहे. परळीतील संभाजीनगर पोलिसठाण्याचे सचिन बाजीराव सानप यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणी आरोपी सरफराज अहेमद दारुद (वय 35 वर्ष रा. तपकन ता. नुहु जि. मेवाड राज्य हरीयाणा) यास मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे.

 

बुधवारी पहाटे ०३:५० च्या दरम्यान परळी शहरातील इटके कॉर्नर येथे कंन्टेनर क्रमांक एच.आर.५५ टी. ४२७१ मध्ये चालक सरफराज अहेमद दारूद (वय ३५ वर्षे रा. तपकन ता. नुहु जि. मेवाड राज्य हरीयाणा) याने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या मालाची विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतुक करणारा कंटेनर आज परळी शहरातील ईटके कॉर्नर येथे पकडला. या प्रकरणी गुन्हा रजीस्टर नंबर १३१/२०२२ कलम ३२८, २७२, २७३ भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सरफराज अहेमद दारूद (वय ३५ वर्ष रा. तपकन ता. नुहु जि. मेवाड राज्य हरीयाणा) यास अटक करण्यात आली आहे.

 

या कारवाईत १० लाख ८ हजार रुपयांच्या २८ पांढर्‍या रंगाचे मोठे बोरे प्रत्येकी बोरमध्ये ८ पांढर्‍या रंगाचे पोते ज्यामध्ये प्रिमीयम राज निवास सुगन्धीत पान मसाला आढळून आला. ज्याची किंमत अंदाजे ३६ हजार रुपये असा एकूण १० लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल ज्याची किंमत ३६ हजार रूपये असा एकुण १००८०००  रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, असा एकुण १९,४८०००  रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरिक्षक एस. एस. चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरिक्षक सी. एच. मेढके हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.