खरिप पिक विमा भरण्याची ३१ जूलै पर्यंत मुदत

जिल्ह्यासाठी बजाज अलायन्स जनरल इन्शूरन्स कंपनीकडे विमा भरण्यात येणार

0

रयतसाक्षी: बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात ७० ते ७५  टक्के पेरण्या झालेल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खरपी पिकाचा विमा भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यासाठी बजाज अलायन्स जनरल इन्शूरन्स कंपनीकडे विमा भरण्यात येणार असून ३१ जुलै २०२२ पर्यंत विमा भरण्याची मुदत देण्यात आली आहे.

 

खरिप, रब्बी पिकांना नैसर्गीक आपत्तीपासून संरक्षीत विमा कवच लागू करण्यात आले आहे.  अतिवृष्टी, दुष्काळ यासह हवामान बदलांमुळे  नैसर्गीक संकटाने पिकांचे नुकसान होते. पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थीकदृष्ट्या उद्ध्वस्त होतो. संकटकाळात शेतकर्‍यांना दिलासा मिळावा या उद्देशाने शासनाने पीक विमा भरण्याची योजना सुरू करण्यात आली आहे.

 

बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात सद्यस्थितीत साधारण ७० ते ७५ टक्के पेरण्या झाल्या आहेत.  पिक विमा कंपणीच्या प्रचलित नियमांनुसार पेरणी नंतर विमा भरण्याची प्रक्रिया सुरू असून बाजरी, ज्वारी, भूईमुग, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, मका, कांदा इत्यादी खरीप पिकांचा विमा भरण्यासाठी ३१ जूलै २०२२ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.