शिरूरमध्ये चक्रिमटक्याच्या गतीला प्रशासनाचे इंधन !

सामांन्याच्या संसारावृक्षाला लागलीय लूटीची वाळवी; समस्याग्रस्त महिला आंदोलनाच्या पावित्र्यात

0

रयतसाक्षी: माहिती तंत्रज्ञाणाच्या युगात इंटरनेटचा वापर जसा हिताचा आहे, तसाच लूट, फसवणूक आणि अहितास कारणीभूत ठरत आहे. असाच काहीसा प्रकार शिरूर शहरात रासरोज सुरू असलेल्या अवैध चक्रिमटक्याच्या माध्यमातून समोर आला आहे. अवैध ऑनलाईन चक्रिमटका जुगारामुळे सामान्यांच्या संसारवृक्षाला लूटीची वाळवी लागली आहे.

 

चक्रिमटक्याच्या गतीने लूटीचा प्रभाव वाढल्याने कौटूंबीक अर्थकारणाला व्यसनाधिनतेची उटी लागली आहे. लोकहिताचा मागमूस नसलेले जबाबदार प्रशासन चिडीचूप असल्याने दुर्दैवाने कौटूंबीक कलहाने त्रस्त महिलांनीच आता कंबर कसली आहे. शहरातील चक्रिमटका तात्काळ बंद करून बुकी चालकावर कठोर कारवाईच्या मागणीसाठी आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.

 

गळीत हंगाम संपताच उसतोड मजुर गावी स्थिरावल्याने तालुक्यातील उद्योग, व्यवसायांना चांगलीच बरकत मिळते. त्यातच खरिप हंगाम असल्याने खरेदी- विक्रीसाठी बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांमुळे शहराच्या गल्ली बोळांना जत्रेचे स्वरूप आले आहे. दरम्यान, शहराकडे धाव घेणाऱ्या नागरिकांच्या साधे-भोळे पणाचा गैर फायदा घेऊन शहरात मागील पंधरवाड्यापासून एक अफलातून अवैध ऑनलाईन चक्रिमटका नावाचा जुगार रासरोज सुरू करण्यात आला आहे.

 

उसतोड मजुरांना उचली सुरू झाल्याने जास्तीच्या पैशाचे अमिष दाखवून चक्रिमटका चालक सर्रास त्यांची लूट करीत आहे. गरजा भागविण्यासाठी चक्रिमटक्याच्या बुकीकडे वळणाऱ्या उसतोड मजुरांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या खिशावर दिवसाढवळ्या डल्ला मारण्यात येत आहे. माध्यमांनी चक्रिमटक्याकडे डोळे फिरवताच अवैध चक्रिमटका चालकाने जागा बदलून आपला लूटीचा गोरख धंदा थाटला आहे.

 

ऑनलाईन चक्रिमटक्याची लत लागल्याने घामाचा पैसा जुगारावर उधळून नशा पाणी करत घरी परतणारा उसतोड मजुर, विद्यार्थ्यांमुळे कौटूंबीक कलह वाढत आहेत. त्यामुळे किरकोळ तंट्यानां तोंड फूटत असल्याने महिलांच्या सन्मानास ठेच पोहचून संसार रस्त्यावर येत आहेत. वारंवार मागणी करूनही कारवाईस जानिवपूर्वक वेळ मारून नेणाऱ्या पोलिस प्रशासनाला मात्र याचे कसलेही सोयर सुतक नसल्याचे दिसून येत आहे.

 

अवैध चक्रिमटक्याच्या लूटीच्या धंद्यात पोलिसांशी लागे बांधे असल्याने कारवाईपूर्वीच बुकी चालक सुशिक्षीत बेकार तरूणांच्या हाती सुत्र देवून पसार होत आहे. किंवा पोलिस प्रशासनाकडूनच कारवाईचे संकेत दिले जात नसावेत ना ? असा प्रश्न निर्माण होत आहे. सामान्याच्या लूटीने तुंबड्या भरणाऱ्या बुकी चालकाच्या पाठीवर पोलिस प्रशासनातील काहींचे अदृष्य हात असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. सामाजीक स्वास्थ टिकून कायदा सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी सातत्याने पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही शहरातील बाजारतळावरील सिध्देश्वर रोड लगत पत्र्याच्या सेडमधील अवैध चक्रिमटका बंद होत नसल्याने मिरा येवले यांनी थेट पोलिस अधिक्षकांकडे धाव घेत शहरातील बाजारतळ, सिध्देश्वर रोड लगतच्या अवैध चक्रिमटका चालकावर कठोर कारवाई करून चक्रिमटक्याची बुकी तात्काळ बंद करण्यात यावी अन्यथा समस्याग्रस्त महिलांसमवेत सहकुटूंब जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलनाचा ईशारा त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरीक्षक, आष्टीचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.

 

लूटीसाठी हजारोंचा हप्ता : अवैध चक्रिमटका चालू ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनास हजारों रूपयांचा हप्ता दिल्याची आवई बुकी चालकाने उठवली आहे. दरम्यान, नाव न छापण्याच्या अटीवर सुत्रांच्या माहिती नुसार बुकी चालक पोलिस प्रशासनाकडे ठरलेल्या वेळेत पॉकेट पोहच करीत असल्याने कारवाई होत नसल्याचे सांगितले जात आहे.

 

प्रशासनातील नातेवाईकांच्या कुबड्या

अवैध चक्रिमटका चालकाचे जवळचे नातेवाईक पोलिस प्रशासनामध्ये कार्यरत असल्याने रयतसाक्षी च्या न्यूज पोर्टलवर वृत्त प्रकाशीत होताच “माझा जवळचा नातेवाईक पोलिस प्रशासनामध्ये कर्यरत आहे माझे कोणी काहीच वाकडे करू शकत नाही” अशा बातम्यांनी काहीच फरक पडत नसल्याचे यंत्रणेसह माध्यमांना आव्हान देत आहे.

 

दोन हजाराचा मामला : पोलिस कारवाईच्या धास्तीने अवैध चक्रिमटका चालक बुकीवर स्वत: न थांबता रोजगाराच्या शोधात बेकार तरूणांच्या हाती सुत्रे सोपवून बुकी चालक ताक फूंकुन पित आहे. प्रत्यक्षात पोलिस कारवाई होतच नाही, अपवादाने झालीच तर बुकीवरील बेकार तरूणांना तास दोन तास ताटकळत बसावे लागते. चार दोन हजारामध्ये मामला रफा दफा होत असल्याच्या वल्गनाही बुकी चालकाकडून केल्या जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.