अपहरण करत खोलीत डांबून एकास बेदम मारहाण

शिरूर पोलिस आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल

0

रयतसाक्षी : मजुरांना उसतोडणीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून तालुक्यातील कान्होबाचीवाडी येथील एकास बळजबरीने चारचाकी वाहनात बसवून एका खोलीत डांबून ठेवत मारहानीची घटना गुरूवारी (दि.७) कान्होबाचीवाडी येथे घडली या प्रकरणी शिरूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील कान्होबाचीवाडी येथील गोरख कचरु बोरगे (वय २६ वर्षे) यास उमेश ऊर्फ दंडम अण्णा जाधव (रा. शिरापूर ता. पाटोदा), लहू संताराम गायकवाड (रा. रायमोहा), संभाजी नेटके (रा. कोळवाडी ता. शिरूर) व अज्ञात एका व्यक्तीने बळजबरीने कान्होबाचीवाडी येथून चारचाकी गाडीत बसवून शिरापूर धुमाळ शिवारातील खडी साखर कारखान्याजवळ नेऊन तेथील एका रुममध्ये डांबून ठेवले,  व ‘तुला ऊसतोड मजुरांना पैशासाठी फोन करू नको, असे सांगीतलेले असतानाही तु फोन का करतो?’ म्हणत त्यास जबर मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शिरूर पोलिसात कलम ३६५, ३२४, ३४२, ३२३, ५०४, ५०६, ३४ भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरूर कासार पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.