चालत्या दूचाकीमधून निघाला साप

दूचाकीस्वाराच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

0

केज, रयतसाक्षी : सकाळी शेतातून दुध आणण्यासाठी एकजण स्कुटीवर जाताना घरापासून काही अंतरावर गेल्यावर अचानक हेडलाईट पासून एक साप बाहेर आला. परंतु न घाबरता दुचाकीस्वाराने गाडी थांबवली व सापास बाहेर काढले. हा घोणस जातीचा विषारी साप असल्याचे सांगितले जात असून दुचाकीस्वाराच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. ही घटना आज शुक्रवारी ( दि. ८ ) सकाळी आडस ( ता. केज ) येथे घडली आहे. दुचाकी तपासूनच बाहेर निघा असे आवाहन करण्यात येत आहे.

 

पावसाळ्याचे दिवस असून, पाऊस पडल्याने जमिनीतील छिद्रे बंद झाली आहेत. त्यामुळे साप बाहेर निघत आहेत. ते जागा मिळेल तिथे आपलं मुक्काम ठोकत आहेत. याचा प्रत्यय आडस येथील घटनेवरून आलं. येथील पुरुषोत्तम तागड यांची स्कुटी क्रमांक एम.एच. १२ एल आर ७७७९ ही रात्री घराबाहेर उभी होती. आज शुक्रवारी सकाळी तागड यांच्याकडे चालक ( ड्रायव्हर ) म्हणून काम करत असलेले अभिषेक लाखे हे स्कुटी वर दूध काढण्यासाठी शेतात चालले होते.

 

यावेळी ते घरापासून उप बाजार समिती जवळ आले असता स्कुटीच्या हेडलाईट पासून एक साप बाहेर आलेला दिसला. साप पहाताच ते घाबरले परंतु प्रसंगावधान राखून स्कुटी उभी केली. जवळच असलेल्या वॉशिंग सेंटरवरील काहींना मदतीसाठी हाक दिली. त्यांनी येऊन त्या सापाला बाहेर काढले. राज्यात अढणाऱ्या चार विषारी सापा पैकी विषारी घोणस असल्यांच उपस्थितांनी सांगितल.

 

दरम्यान, वेळीच लक्ष गेलं नसतं अथवा घाबरून दुचाकीवरून पडले असते व पुन्हा चवताळून सापाने चावा घेतला असता तर? या विचाराने मनाचा थरकाप उडाला. वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. तर दुचाकी धारकांनी सकाळी दुचाकी बाहेर काढताना लक्ष पुर्वक पाहायला हवं नंतरच दुचाकी बाहेर काढावी असे आवाहन करण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.