मुख्यालयी राहत नसलेल्या ३१८ ग्रामसेवक, शिक्षकांवर फसवणूकीचे गुन्हे दाखल

बहूसंख्य कर्मचाऱ्यांवर राज्यातील पहिलाच गुन्हा, नांदेडच्या प्रशासनात खळबळ; घरभाडे उचलून केली शासनाची फसवणूक

0

नांदेड, रयतसाक्षी : जिल्ह्यातील अर्धापूर पंचायत समिती अंतर्गत शासकिय सेवा बजावणाऱ्या ३१८ कर्मचाऱ्या विरूध्द मुख्यालयी न राहता घरभाडे उचलून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश अर्धापूर न्यायालयाने दिले होते. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार रविवारी दि.१० सायंकाळी उशीरा येथील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मा. न्यायालयाच्या दणक्यामुळे जिल्ह्यातील प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

 

अर्धापूर पंचायत समिती अंतर्गत असलेले अनेक कर्मचारी विशेषत: शिक्षक व ग्रामसेवक मुख्यालयी न राहता घरभाडे भत्ता उचलत असल्याची माहिती उघड झाल्या नंतर आर. टी. आय. कार्यकर्ते सय्यद यूनूस पार्डीकर यांनी अनेक तक्रारी करून मुख्यालयी राहत नसल्याबाबत प्रशासनाच्या निदर्शनास आणुन दिले. तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीसाठी टाळाटाळ होत होती.

 

तर तक्रार मागे घेण्यासाठी आर. टी. आय कार्यकर्त्यांवर दबावतंत्राचा वापर केला जात होता. अशाही परिस्थिती त्यांनी अर्धापूर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. त्यानुसार येथील न्यायाधीश एम. डी. विरहारी यांनी अशा एकून ३१८ शासकिय कर्मचाऱ्यांविरूध्द फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले.

 

या प्रकरणी जेष्ठ विधिज्ञ ऍड . ए. आर. चाऊस यांच्या माध्यमातून अर्धापूर न्यायालयात सदरील खटला दि.३० मार्च २०२२ रोजी सय्यद यूनूस यांनी दाखल केला होता. मा. न्यायालयासमोर सर्व सत्य बाबी निदर्शनास आणून दिल्यानंतर ३१८ कर्मचाऱ्यांविरूध्द दि. ७ जुलै रोजी १५६ /३ सी.आर.पी.सी अन्वये गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश न्यायाधीश एम.डी. बिरहारी यांनी दिले होते. त्यानुसार रविवारी दि.१० सायंकाळी अर्धापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरिक्षक अशोक जाधव व राजेश गुन्नर हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.