विद्यार्थांनी कायद्याचे ज्ञान आत्मसात करावे – पोलिस निरीक्षक श्री. माने

शस्त्रांच्या स्पर्शाने भारवल्या विद्यार्थीणी, जि.प. हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी घेतली पोलिस ठाण्याच्या कामकाजाची माहिती

0

शिरूर कासार, रयतसाक्षी : कायदा हा लोकशाहीचा अविभाज्य घटक आहे. बालवयात विद्यार्थी दशेत कायद्याचे ज्ञान आत्मसात करण्याचे अवाहन शिरूर कासार पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सिध्दार्थ माने यांनी केले. येथील जिल्हा परिषद हायस्कुलच्या विद्यार्थीणींना बुधवारी (दि.३) शस्त्रांसह पोलिस ठाण्याच्या कामकाजांची माहिती देताना ते बोलत होते.

 

बालवयात विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्याच्या कारभारासह शस्त्रांचे ज्ञान अवगत व्हावे या उद्देशाने बुधवारी दि. ३ शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सिध्दार्थ माने यांनी शहरातील जिल्हा परिषद हायस्कुलच्या विद्यार्थींणींचा पोलिस ठाण्याच्या प्रांगणात कँप घेतला. शाळेचे मुख्याध्यापक श्री . शिंदे, शिक्षीका श्रीमती धाबे यांच्या सह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलिसां विषयी विद्यार्थ्यांमधील भय दूर होऊन मोकळ्या वातावरणात त्यांना कामकाजासह शस्त्रांची माहिती आत्मसात करता यावी या उद्देशाने पोलिस निरिक्षक माने यांनी प्रत्यक्षात विद्यार्थीणींमध्ये मिसळून मार्गदर्शन केले.

विद्यार्थीं दशेतच त्यांच्यातील कौशल्य गुणांना वाव मिळतो, गुणवत्तेचे शिखर गाठण्याची विद्यार्थींमध्ये  मोठी स्पर्धा आहे. अभ्यासामध्ये लिन होत जिद्द, मेहनत, चिकाटीच्या बळावर अनेकांनी देश पातळीवर लौकीक मिळवले आहे. कायदा हा लोकशाहीचा अविभाज्य घटक आहे त्यासाठी विद्यार्थी दशेत कायद्याचे ज्ञान अत्मसात करण्याचे प्रतिपादन पोलिस निरिक्षक माने यांनी विद्यार्थीनींना मोबाईल नंबर देऊन अडचणींच्या वेळी संपर्क करण्याचे अवाहन करत धीर दिला. यावेळी ठाणे आमंलदार ए. एस. आय. शंकर करांडे, पोलिस ना. श्री. गुजर, श्री. सोनवणे आदींसह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.