कमळेश्वर धानोरा शिवारात वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्या

सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाची कारवाई; २७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

0

शिरुर का., रयतसाक्षी: तालुक्यातील कमळेश्वर धानोरा शिवारात सिंदफणा नदी पात्रात पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने धाड टाकून २७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला . दरम्यान , सिंदफणा नदीपात्रात यंत्राद्वारे अवैध वाळू उपस्याच्या गुप्त माहिती वरुन केलेल्या कारवाईत जेसीबी, ट्रॅक्टरसह १५० ब्रास वाळू साठा बुधवारी (दि .४ ) जप्त करण्यात आला.

 

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना कमळेश्वर धानोरा येथे काही इसम सिंदफणा नदीपात्रात विनापरवाना बेकायदेशीर जेसीबी च्या साह्याने वाळू उपसा करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने चोरटी वाहतूक करुन विक्रीसाठी साठा करत करत असल्याची गुप्त माहिती मिळाली . पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील अधिकारी , कर्मचारी यांच्यासह महसूलचे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी कमळेश्वर धानोरा शिवारातील सिंदफना नंदी पात्रात ४:०० दरम्यान , छापा मारला असता नदी पात्रात वाळू उपसा करून ट्रॅक्टर मध्ये वाळू भरणारे जीसीबी वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर ताब्यात घेऊन मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासहाय्याने जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतले.

 

जीसीबी, ट्रॅक्टरने नदीपात्रातून वाळू वाहतूक करत साठा केलेला अंदाजे दीडशे ब्रास वाळूसाठा जप्त करून जेसीबी व दोन ट्रॅक्टर ताब्यात घेतले. जप्त वाहनं व जेसीबी तहसील कार्यालयात लावले . दरम्यान , जप्त केलेले जेसीबी दोन ट्रॅक्टर अंदाजे किंमत २७००००० रुपये व अंदाजे १५० ब्रास वाळू किंमत ९०००० रुपये असा एकुण २७ लाख ९०००० रुपया चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .

 

जप्त करण्यात आलेल्या वाहनावर वाळू साठयावर तहसीलदार कारवाई करत आहेत. पोलिस अधीक्षक श्री नंदकुमार ठाकूर साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, सहा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील बालाजी दराडे , पोलीस नाईक राजू वंजारे ,संजय टूले, दीपक जावळे , मंडळ अधिकारी खंडागळे साहेब,तलाठी शिंदे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.