भारतीय काँग्रेसच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

तहसीलदार मनाळे यांची उपस्थिती ;युवकांनी आंबेडकरी चळवळ गतिमान करावी -- दत्ता कांबळे

0

माजलगाव, रयतसाक्षी: भारतीय काँग्रेस अनु जाती विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त छोट्या खानी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी तहसीलदार वर्षा मनाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील भीम नगर येथील स्मारकस्थळी भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यासतहसीलदार वर्षा मनाळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात केले .

यावेळी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांनी ,” सुशिक्षित युवकांनी व सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रित येऊन,आंबेडकरी चळवळ गतिमान करावी”, असे आवाहन केले.

तहसीलदार वर्षा मनाळे सह काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे,माजी जिल्हा परिषद सदस्य‌ डॉ. श्रीराम खळगे, माजी नगरसेवक रामभाऊ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते अशोक ढगे, भारिपचे अंकुश जाधव , सामाजिक कार्यकर्ते नवनाथ धाईजे,अशोक लांडगे सर,शाहीर युराज ढगे ,अफरोज तांबोळी , हरिश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.