उपराष्ट्रपतिपदासाठी आज मतदान: NDAकडून जगदीप धनखड तर विरोधी पक्षांकडून अल्वा मैदानात, 5 वाजेनंतर होणार मतमोजणी

उपराष्ट्रपतिपदासाठी आज शनिवारी मतदान होणार आहे.

0

रयतसाक्षी : उपराष्ट्रपतिपदासाठी आज शनिवारी मतदान होणार आहे. यामध्ये एनडीएकडून जगदीप धनखड आणि विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा या पदाच्या उमेदवार आहेत. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य मतदान करतात. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर लगेच मतमोजणी होईल आणि रात्री निकाल जाहीर केला जाईल. विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपुष्टात येत आहे.

 

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ७८८ सदस्य आहेत. त्यानुसार एनडीएचे उमेदवार व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांचा विजय निश्चित आहे. दरम्यान, टीआरएसने अल्वा यांना समर्थन देण्याची घोषणा करत विरोधी पक्षाला बळकटी दिली आहे. तर तृणमूल काँग्रेसने अल्वा यांच्या नावावर सल्ला न घेण्याचा आरोप लावत मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. अशा वेळी धनखड यांच्या बाजूने ५१५ व अल्वा यांच्या पारड्यात २०० मते पडण्याची अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.