राऊतांनी कोठडीतून लिहिले पत्र: भाजपच्या खेळीपुढे शिवसेना झुकणार नाही, धीर सोडू नका विजय आपलाच होणार.

बाळासाहेबांची शिकवण आहे, शिवसैनिकांनी रडायचे नाही.

0

रयतसाक्षी :बाळासाहेबांची शिकवण आहे, शिवसैनिकांनी रडायचे नाही, सत्यासाठी लढायचे. त्यामुळे धीर सोडू नका. विजय आपलाच होणार आहे, असे पत्र शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या मित्रपक्षांना लिहिले आहे. संकटकाळातच आपल्यासोबत कोण आहेत आणि शुभचिंतक कोण आहेत, हे कळते.

भाजप आणि केंद्र सरकारने आपल्याविरोधात राजकीय सूडाचे नाट्य रचले आहे. मात्र, भाजपच्या खेळीपुढे शिवसेना झुकणार नाही. ईडीच्या चौकशीमुळे शिवसेना नमते घेणार नाही. मी शेवटपर्यंत लढणार असून कितीही दबाव आला तरी भीक घालणार नाही, असे राऊतांनी पत्रात म्हटले आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवलेल्या पत्रात राऊतांनी शिवसेनेला मदत केल्याबद्दल आभार मानले आहेत.

 

संजय यांनी लिहिले की, आयुष्याच्या सर्वात कठीण काळात आपले मित्र कोण असतात हे स्पष्ट होते. सध्या माझ्याविरोधात सुरू असलेल्या राजकीय सूडनाट्यात तुम्ही दिलेल्या पाठिंब्यामुळे मी आभारी आहे. केंद्र सरकारतर्फे केंद्रीय तपास यंत्रणांद्वारे हेतुपुरस्सर चौकशी सुरू आहे. सत्यासाठी माझा लढा सुरूच राहील. कितीही दबाव आला तरी लढा सुरू ठेवेन. मी दबावाला बळी पडणार नाही.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, रडायचे नाही, लढायचे.. सत्यासाठी लढायचे… या लढ्यात माझ्या पाठीशी शब्दांचे बळ देण्यात तसेच कृती आणि विचारसरणीतून पाठीशी राहण्यात तुम्ही साथ दिली. त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे.

राऊतांनी कोठडीतून लिहिले पत्र
पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. काँग्रेस व इतर मित्रपक्षांनी संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईचा निषेध केला होता. त्याबद्दल राऊत यांनी या पत्राद्वारे त्यांचे आभार मानले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.